Aaditya Thackeray : …म्हणून वेदांता गुजरातला..! आदित्य ठाकरेंनी ठेवले शिंदे गटाच्या जखमेवर बोट
खोके सरकार हे केवळ आपला गटाचे संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यामुळेच वेदांतासारखा प्रोजेक्टकडे दुर्लक्ष झाले आणि मावळमध्ये होणार प्रोजेक्ट आज गुजरातमध्ये होत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.
मुंबई : वेदांता प्रकल्प (Vedanta Project) हा गुजरातला गेला असला तरी त्यावरुन चर्चेचे गुऱ्हाळ मात्र महाराष्ट्रात सुरु आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी वेदांता प्रकल्पावर खुलासा केल्यानंतर विरोधकांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली. हा प्रकल्प गुजरातला (Gujrat) गेल्याने 2 बेरोजगारांच्या नौकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. खोके सरकार हे केवळ आपला गटाचे संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यामुळेच वेदांतासारखा प्रोजेक्टकडे दुर्लक्ष झाले आणि मावळमध्ये होणार प्रोजेक्ट आज गुजरातमध्ये होत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. राज्य सरकारच्या निषेधार्थ आदित्य ठाकरे यांनी मावळमध्ये जनआक्रोश आंदोलन केले होते. तर मुख्यमंत्री कोणता प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी दिल्लीवारी करीत नाहीत तर त्यामागे त्यांचा स्वार्थ असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले आहे.