पुणे : (Shivsena Party)शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरीची भूमिका घेतल्यापासून भूम-परंडा आणि वाशी मतदार संघाचे (Tanaji Sawant) आमदार तानाजी सावंत हे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिलेले आहेत. पावसाळी अधिवेशनात पालघरच्या आरोग्य यंत्रणेबद्दल विरोधकांकडून त्यांना विचारणा करण्यात आली होती. त्यावरुनही ते सोशल मिडियामध्ये चर्चेत होते. पण पुण्यात चर्चा आहे ती त्यांनी अचानक जहांगीर हॉस्पीटलला भेट दिल्याची. आरोग्य मंत्री असलेले तानाजी सावंत हे कोणताही नियोजित कार्यक्रम नसताना थेट जहांगीर हॉस्पीटलमध्ये पोहचले, (Health Minister) आरोग्यमंत्री आणि थेट हॉस्पीटलमध्ये त्यामुळे अनेकांनी काही सुचेनाही गेले. कर्मचारी हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करीत होते,तर कोणी धावपळ करीत त्यांचे स्वागत करीत होते. मात्र, तानाजी सावंत यांच्या भेटीचे कारण हे निराळेच निघाले, त्यांचा गावाकडचा कार्यकर्ता हा जहांगीर हॉस्पीटलमध्ये उपचार घेत होता. त्याच्या भेटीसाठी ते आले होते. मात्र, त्यांच्या अशा अचानक दौऱ्यामुळे आरोग्य विभागाची चांगलीच धांदल उडाली.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे कार्यकर्त्याच्या भेटीच्या अनुशंगाने जहांगीर हॉस्पीटलमध्ये गेले असले तरी, त्यांनी तेथील सेवा सुविधांची पाहणी केली. एवढेच नाही तर कर्मचाऱ्यांशी संवाद करीत या खाजगी रुग्णालयातील व्यवस्थेचा आढावा घेतला. विविध विभागात जाऊन यंत्र सामुग्रीची पाहणी केली एवढेच नाहीतर काही कमी असल्यास त्या साधनांची मागणी करा पण रुग्णांची गैरसोय नको अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे त्यांचा हा अचानक झालेला दौरा विविध अंगाने महत्वाचाही ठरलेला आहे.
तानाजी सावंत याचा मतदार संघ हा भूम-वाशी-परंडा हा आहे. मात्र, शुक्रवारी ते पुणे दौऱ्यावर होते. दरम्यान, पुण्यात दाखल होताच आपल्या मतदार संघातील कार्यकर्ता हा पुण्यातील जहांगीर हॉस्पीटलमध्ये अॅडमिट असल्याचे समजले. त्यांनी तात्काळ त्याची दखल घेत कोणतीही पुर्वकल्पना न देता थेट हॉस्पीटल जवळ केले. त्यांच्या अचानक भेटीने रुग्णालयातील प्रशासनाची धावपळ झाली मात्र, आरोग्य थेट भेटीला याबद्दल कार्यकर्त्यामध्ये वेगळाच उत्साह संचारला होता.
शिवसेनेतून शिंदे गट निर्माण झाल्यापासून तानाजी सावंत हे कायम चर्चेत राहिलेले आहेत. यापूर्वी ते कोण आदित्य ठाकरे यावरुन चर्चेत राहिले होते. त्यांच्या या विधानाने नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र केले होते. तर पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांनी त्यांना पालघरच्या आरोग्य यंत्रणेबद्दल विचारले होते. मात्र, याबाबत त्यांना अधिकृत काही सांगता आले नाही. शिवाय याबद्दल आपण माहिती घेऊन सांगणार असल्याचे ते म्हणाले होते.