मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केलेल्या आमदारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर निधी वाटपाचा मोठा आरोप केला होता. अर्थमंत्री अजित पवार निधी वाटपामध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांना सर्वाधिक निधी देत आहेत. याची माहिती पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देऊनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शिवसेना संपविण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा डाव होत. पण, आम्ही बंड करून तो डाव उधळून लावला असा आरोप शिंदे गटाने केला होता. निधी वाटपाच्या मुद्दा पुढे करत शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्याशी बंड केले. भाजपसोबत हातमिळवणी करून मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले.
शिंदे फडणवीस सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद आणि अर्थ खाते आले. त्यामुळे निधी वाटपात न्याय मिळेल अशी अपेक्षा असणाऱ्या शिंदे गटाची अपेक्षा फोल ठरली. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच राज्यात जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यासाठी देण्यात आलेल्या निधी वाटपात शिंदे गटाला कमी निधी देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य क्रीडा क्षेत्रात अग्रगण्य रहावे, नागरिकांमध्ये व्यायामाची आवड जोपासावी, राज्यातील खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करण्यासाठी क्रीडा विषयक तंत्रशुध्द प्रशिक्षण, खेळाच्या दर्जात सुधारणा, खेळाडूंना गौरव, दर्जेदार क्रीडा सुविधा या बाबी केंद्रबिंदू मानून खेळाडूंसाठी हितावह योजना राबविण्यासाठी क्रीडा धोरण 2012 तयार करण्यात आले. तसेच, प्रत्येक जिल्हयात प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली.
2022 – 23 या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पातील 450.00 लक्ष तरतूदीमधून 24 जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रांसाठी 1 कोटी 73 लाख 17 हजार 500 रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यात भाजपच्या पालकमंत्र्यांना 1 कोटी 5 लाख 2 हजार रुपये तर शिंदे गटाच्या पालकमंत्र्यांना 68 लाख 15 हजार 500 रुपये इतका निधी देण्यात आला आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये 20 मंत्री असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता अन्य 19 मंत्र्यांकडे 36 जिल्ह्यांची पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पालकमंत्री म्हणून सर्वाधिक सहा जिल्हे आहेत. त्यातील नागपूर जिल्ह्यासाठी सर्वाधिक 11 लाख 92 हजार इतका निधी देण्यात आला आहे. त्या खालोखाल भाजपचे सुरेश खडे यांच्या सांगली जिल्ह्यासाठी 11 लाख 72 हजार आणि त्याखाली गिरीश महाजन यांच्या लातूर जिल्ह्यासाठी 10 लाख 41 हजार 500 इतका निधी देण्यात आला आहे.
शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांचा या यादीत चौथा क्रमांक असून नाशिक जिल्ह्यासाठी 9 लाख 83 हजार 500 इतका निधी देण्यात आला आहे. तर पाचव्या क्रमांकावर भाजपचे मुंबई उपनगरचे मंगल प्रभात लोढा असून त्यांना 9 लाख 53 हजार 500 इतका निधी देण्यात आला आहे. त्यातुलनेत शिंदे गटाचे मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना अवघे 2 लाख 54 हजार इतकाच निधी देण्यात आला आहे.
एकूण – 1 कोटी 5 लाख 2 हजार
एकूण – ६८ लाख १५ हजार ५००
पालकमंत्री जिल्हा
देवेंद्र फडणवीस वर्धा, भंडारा
राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर, सोलापूर
रवींद्र चव्हाण पालघर
अतुल सावे जालना, बीड
संजय राठोड यवतमाळ, वाशीम
तानाजी सावंत उस्मानाबाद
अब्दुल सत्तार हिंगोली
संदीपान भुमरे औरंगाबाद