नवी दिल्ली : कोरोना लस घेतल्यानंतर मिळणार प्रमाणपत्र (Vaccination Certificate) पाहिलं, तर त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा फोटोही दिसून येतो. मात्र आता काही राज्यात हा फोटो प्रमाणपत्रावर दिसणार नाही. यामागं नेमकं कारण काय आहे, हे देखील स्पष्ट करण्यात आलंय. एखूण पाच राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर यापुढे छापला जाणार नाही आहे.
उत्तर प्रदेशसह पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय. निवडणुकांच्या तारखा घोषित होताच तत्काळ आचारसंहिताही लागू झाली आहे. आचार संहितेचा भंग होऊ नये यासाठी आता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या राज्यांच्या निवडणुकांची आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या राज्यात लसीकरण मोहिमेअंतर्गत जो कार्यक्रम राबवला जात आहे, त्यात मोदींचा झळकलेला फोटा यापुढे दिसणार नाही. मोदींच्या फोटो लसीकरणाच्या प्रमाणपत्रातही यामुळे निवडणुका असलेल्या आणि आचार संहिता लागू झालेल्या राज्यांमध्ये दिसणार नाही.
शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखेची घोषणा केली होती. या घोषणेनुसार उत्तर प्रदेशात सात टप्प्यात पंजाब, उत्तराखंड, गोवा मध्ये एका तर मणिपूरमध्ये दोन टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत.
1 राज्य – उत्तर प्रदेश
14 जानेवारीला अधिसूचना जारी
किती टप्प्यात मतदान? – 7 टप्पे
कधी कधी मतदान? – 10 फेब्रुवारी , 14फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी , 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 03 मार्च आणि 07 मार्च
निकाल कधी? – 10 मार्च
2 राज्य – पंजाब
8 जानेवारीला अधिसूचना जारी
किती टप्प्यात मतदान? – एकच टप्पा
कधी मतदान? – 14 फेब्रुवारी
निकाल कधी? – 10 मार्च
3 राज्य – उत्तराखंड
8 जानेवारीला अधिसूचना जारी
किती टप्प्यात मतदान? -एकच टप्पा
कधी मतदान? – 14 फेब्रुवारी
निकाल कधी? – 10 मार्च
4 राज्य – गोवा
8 जानेवारीला अधिसूचना जारी
किती टप्प्यात मतदान? – एकच टप्पा
कधी मतदान? – 14 फेब्रुवारी
निकाल कधी? – 10 मार्च
5 राज्य – मणिपूर
8 जानेवारीला अधिसूचना जारी
किती टप्प्यात मतदान? – दोन टप्प्यात
कधी मतदान? – 27 फेब्रुवारी, 3 मार्च
निकाल कधी? – 10 मार्च
Nashik|नाशिक जिल्ह्यात 72935 नागरिकांना मिळणार हक्काचं घर, काय आहे योजना?
Mumbai-Thane Election| शिवसेनेत परिवर्तनाचे वारे; अर्ध्या नगरसेवकांच्या उमेदवारीचा पत्ता कट होणार?