मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमाचं मुंबईत स्पेशल स्क्रीनिंग झालं. पण या स्क्रीनिंगमध्ये मानापमान नाट्य पाहायला मिळालं. सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्या कुटुंबीयांना जागा न मिळाल्याने पानसे स्क्रीनिंग सोडून निघून गेले. त्यानंतर सोशल मीडियावर मनसे कार्यकर्त्यांनी #ISupportAbhijitPanse नावाने मोहीम सुरु केली आहे. मनसेच्या तीन आक्रमक नेत्यांनीही अभिजीत पानसेंच्या समर्थनासाठी मैदानात उतरले आहेत. संदीप देशपांडे, अमेय खोपकर आणि अविनाश जाधव यांनी ट्विटरवरुन अभिजीत पानसे यांना समर्थन देऊन, शिवसेनेवर शरसंधान साधले आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे :
अभिजित शी फोन वर बोललो तो म्हणाला मी चित्रपट मा बाळासाहेबांच्या प्रेमापोटी केला बाकी कोणी कस वागायचं हा ज्याच्या त्याच्या संस्काराचा प्रश्न#I supportabhijitpanse
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 23, 2019
कोणी अपमान करण्याचा प्रयत्न जरी केला तरी लाथ कशी मारायची हे काही लोकांना तुझ्याकडून शिकण्याची गरज आहे#ISupoortAbhijitPanse
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 24, 2019
मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर :
@mnsadhikrut@sanjayraut@aninews अभिजित हे असं वागणं हीच त्यांची संस्कृती आहे पण महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षक हे तुझ्या पाठीशी आहेत
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) January 23, 2019
ठाणे-पालघरमधील मनसेचे नेते अविनाश जाधव :
सोशल मीडियावर मनसेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी #ISupportAbhijitPanse नावाची मोहीमही सुरु केली आहे. त्यावरुन मनसे कार्यकर्ते अभिजीत पानसेंचं समर्थन करण्यासह शिवसेनेवर टीकाही करत आहेत. त्यामुळे या सिनेमामुळे हे दोन पक्ष अधिक जवळ येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना, दुरावाच अधिक निर्माम होताना दिसतोय.
अभिजित पानसे स्क्रीनिंग सोडून माघारी
आज परत तेच झालं
शिवसेनेने अभिजित पानसेचा वापर केला पहिल्यांदा आदित्य ठाकरे ला तयार करण्या साठी आणि आज ठाकरे सिनेमा बनवण्या साठी
राज साहेब बरोबर बोले होते अभिजित हे तुला फसवणार— avinash jadhav (@avinash_mns) January 23, 2019
मुंबईत होणाऱ्या या स्पेशल स्क्रीनिंगसाठी दिग्गज नेते आणि इतर मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे. पण स्वतः दिग्दर्शकच नाराज झाल्यामुळे कुजबुज पाहायला मिळाली. अभिजित पानसे यांना सर्वात पुढचं सीट दिल्यामुळे ते नाराज झाल्याचं बोललं जातंय. संजय राऊत यांनी पानसेंची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. पण यात त्यांना यश आलं नाही. पानसे कुटुंबासह घरी निघून गेले. अभिजित पानसे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे, तर संजय राऊत यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.
खरं तर अभिजित पानसे हे दिग्दर्शक असण्यासोबतच मनसेचे नेतेही आहेत. मनसे आणि शिवसेनेचा छत्तीसचा आकडा आहे. पण सिनेमासाठी संजय राऊत यांनी अभिजित पानसेंसारख्या अनुभवी आणि कुशल दिग्दर्शकाची निवड केली होती. या सिनेमासाठी मनसेने अभिजित पानसेंना पोस्टरबाजी करत शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे या पोस्टरवर कुठेही संजय राऊत यांचं नाव किंवा फोटो नाही.
कोण आहेत अभिजित पानसे?
अभिजित पानसे हे प्रसिद्ध सिनेलेखक आणि दिग्दर्शक आहेत. 2014 मध्ये आलेला रेगे हा मराठी सिनेमा प्रचंड गाजला होता. रेगे हे अभिजित पानसे यांचं मोठं यश असल्याचं मानलं जातं. ठाकरे सिनेमासाठीही संजय राऊत यांनी अभिजित पानसे यांची निवड केली.
वाचा – ठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक स्क्रीनिंग अर्ध्यावर सोडून निघून गेले
अभिजित पानसे सिनेमाव्यतिरिक्त राजकारणातही सक्रिय असतात. पानसे यांनी चित्रपट सेनेची जबाबदारी सांभाळलेली आहे. राज ठाकरेंच्या जवळचे नेते म्हणून ते परिचित आहेत. अगोदर शिवसेनेत असलेले अभिजित पानसे नंतर मनसेत आले होते. त्यांनी 2014 ची लोकसभा निवडणूकही लढली होती.
वाचा – ... म्हणून अभिजित पानसे स्क्रीनिंग अर्ध्यावर सोडून निघून गेले