मुंबई: महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचं घराणं असलेल्या पवार कुटुंबातील वादावर पहिल्यांदाच एका पुस्तकातून ओझरता प्रकाश टाकण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कुटुंबात पक्षावरील नियंत्रणावरून वाद नसला तरी सारं काही अलबेल नसल्याचंही या पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे. पक्षावरील नियंत्रणावरून आमदार रोहित पवारांना बळ दिलं जात असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना डावललं जात असल्याचा धक्कादायक खुलासा या पुस्तकात करण्यात आला आहे. (trading power book focus on Pawar family politics in maharashtra)
‘पॉवर ट्रेडिंग’ असं या पुस्तकाचं नाव आहे. प्रियम गांधी यांनी यांनी हे पुस्तक लिहिलं असून ते प्रकाशनाच्या मार्गावर आहे. प्रियम गांधी या राजकीय विश्लेषक आणि मीडिया सल्लागार आहेत. 23 नोव्हेंबर 2019 रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेच्यावेळी सत्ता स्थापन केली होती. यावेळी पडद्यामागे काय हालचाली झाल्या होत्या?, राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांच्या कशा बैठका झाल्या?, शरद पवारांचा भाजपसोबत जाण्यापेक्षा शिवसेनेसोबत जाण्याकडे कल का होता? अजित पवारांचा शिवसेनेसोबत जाण्याला का विरोध होता?, अजितदादांनी फडणवीसांशी सूत का जुळवून घेतलं?, अजितदादा-सुप्रिया सुळे यांच्या दरम्यानचं शीतयुद्ध आणि रोहित पवारांना दिलं जाणारं बळ आणि पार्थ पवारांना डावललं जाणं आदी बाबींवर या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. मात्र, एका राष्ट्रवादीच्या नेत्याच्या हवाल्यावरून या पुस्तकात ही माहिती दिली असली तरी या पुस्तकात माहिती देणाऱ्या त्या राष्ट्रवादीच्या नेत्याचं नाव गुप्त ठेवण्यात आलं आहे.
राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची जवळीक वाढू लागली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादीच्या एका नेत्यासोबत चर्चा झाली. त्यावेळी या नेत्याने अजित पवार तुमच्यासोबत सत्ता स्थापन करू शकतात. त्यांचा शिवसेनेसोबत आघाडी करण्यास विरोध आहे, असं फडणवीसांना सांगितलं. त्यासाठी या नेत्याने शिवसेनेसोबत जाण्यास अजितदादा इच्छूक नाहीत, सुप्रिया सुळे यांच्यासोबत अजितदादांचं शीतयुद्ध आहे, तसेच अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार यांना डावललं जात असून रोहित पवारांना बळ दिलं जात आहे. त्यामुळेही अजितदादा नाराज असल्याचं या नेत्याने फडणवीस यांना सांगितल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.
तर, पवार कुटुंबात वाद असे नाहीत. पण पक्षावरील कमांड कुणाची राहावी या मुद्द्यावरून पवार कुटुंबात सारं काही अलबेलही नाही. शिवाय पार्थ पवारांना ज्या पद्धतीने पाठबळ मिळायला हवं होतं. तसं मिळालेलं नाही, असं प्रियम गांधी यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना सांगितलं. त्यामुळे पवार कुटुंबात वाद नसले तरी काहीच अलबेल नसल्याचं अधोरेखित होत आहे.
EXCLUSIVE : पहाटेच्या शपथेची इनसाईड स्टोरी, Trading Power पुस्तकात मोठे खुलासेhttps://t.co/SJFwBsZxyC@AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis #Exclusive #PriyamGandhi #TrendingPower
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 25, 2020
संबंधित बातम्या:
PHOTO : 80 तासांच्या सरकारची वर्षपूर्ती; ‘त्या’ ऐतिहासिक दिवसाचे फोटो
शिवसेनेच्या नेतृत्त्वातील युतीला अजित पवारांचा विरोध का?; ‘ट्रेडिंग पॉवर’मधील खळबळजनक दावे
(trading power book focus on Pawar family politics in maharashtra)