Tv9-C Voter Exit Poll | केंद्रातील सत्तेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं राज्य मानलं जाणाऱ्या उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का बसणार असून, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष मोठी मुसंडी मारणार आहे, असे चित्र ‘टीव्ही 9’ आणि ‘सी व्होटर’च्या एक्झिट पोलमधून समोर आले आहे. उत्तर प्रदेशात सपा-बसपाला 40, तर भाजप आणि मित्र पक्षांना 38 जागा मिळतील. तसेच, काँग्रेसला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागेल, असे एकंदरीत चित्र ‘टीव्ही 9’ आणि ‘सी व्होटर’च्या एक्झिट पोलमध्ये दिसत आहे.
उत्तर प्रदेशात लोकसभेच्या एकूण 80 जागा आहेत. भाजपप्रणित एनडीएला 2014 साली 73 जागा मिळाल्या होत्या. त्यावरुन यंदा भाजपप्रणित एनडीए 73 वरुन थेट 38 वर येणार आहेत, असे एक्झिट पोलमध्ये दिसते आहे.
दुसरीकडे, 2014 साली समाजवादी पक्षाला केवळ 5 जागा मिळाल्या होत्या, तर बहुजन समाज पक्षाला शून्य जागा मिळाल्या होत्या. यंदा सपा आणि बसपाने युती केल्याने त्यांच्या जागा थेट 40 वर जाणार असल्याचे ‘टीव्ही 9’ आणि ‘सी व्होटर’च्या एक्झिट पोलमध्ये दिसून येत आहे.
उत्तर प्रदेशात कुणाला किती जागा?
2014 सालीही काँग्रेसला उत्तर प्रदेशात अमेठी आणि रायबरेली अशा केवळ दोनच जागा मिळाल्या होत्या. यंदाही एक्झिट पोलनुसार काँग्रेसला उत्तर प्रदेशात दोनच जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
एग्झिट पोल | भाजप + | काँग्रेस + | इतर |
---|---|---|---|
टीव्ही 9-सी व्होटर | 287 | 128 | 127 |
टाईम्स नाऊ –VMR | 306 | 132 | 104 |
एबीपी-नेल्सन | 267 | 127 | 148 |
न्यूज 24 – टुडेज चाणक्य | 340 | 70 | 133 |
न्यूज नेशन | 282-290 | 111-126 | 130-138 |
न्यूज 18- IPSOS | 336 | 82 | 124 |
इंडिया न्यूज –पोल स्ट्रॅट | 287 | 128 | 127 |
न्यूज एक्स | 242 | 164 | 136 |
रिपब्लिक – जन की बात | 305 | 124 | 87 |
संबंधित बातम्या :
Tv9-C Voter Exit Poll : देशात मोदींना बहुमत, काँग्रेस 100 च्या आत!
Tv9 C Voter exit poll Maharashtra : महाराष्ट्रात युतीला 34 जागा