Tv9-C Voter Exit Poll | पश्चिम बंगालमध्ये यंदा कुणाला किती जागा मिळणार, याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. कारण पश्चिम बंगालमधील हिंसाचारामुळे इथल्या निकालाची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. मात्र, ‘टीव्ही 9’ आणि ‘सी व्होटर’च्या एक्झिट पोलमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला 29, तर भाजपला 11 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर काँग्रेसला दोन जागा मिळतील, असेही एक्झिट पोलमध्ये दिसते आहे.
पश्चिम बंगालमध्ये कुणाला किती जागा?
एक्झिट पोलची आकडेवारीची 2014 च्या निकालाशी तुलना केल्यास, असे लक्षात येते की, भाजपने मोठी मुसंडी मारली आहे. भाजपला 2014 साली केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. आता एक्झिट पोलनुसार दोनवरुन थेट 11 जागा मिळतील.
दुसरीकडे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला 2014 साली 34 जागा मिळाल्या होत्या. त्या एक्झिट पोलनुसार 29 वर येतील म्हणजेच 5 जागा कमी होणार असल्याचे चित्र आहे.
काँग्रेसच्या 2014 साली 4 जागा होत्या, त्याही Tv9-C Voter Exit Poll नुसार केवळ दोनच जागा उरतील. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला गेल्यावेळी 2 जागा होत्या. मात्र, यावेळी एकही जागा मिळणार नाही.
पक्ष | जागांचा अंदाज (महाराष्ट्र) |
---|---|
भाजप | 19 |
शिवसेना | 15 |
काँग्रेस | 8 |
राष्ट्रवादी | 6 |
एकूण | 48 |
एग्झिट पोल | भाजप + | काँग्रेस + | इतर |
---|---|---|---|
टीव्ही 9-सी व्होटर | 287 | 128 | 127 |
टाईम्स नाऊ –VMR | 306 | 132 | 104 |
एबीपी-नेल्सन | 267 | 127 | 148 |
न्यूज 24 – टुडेज चाणक्य | 340 | 70 | 133 |
न्यूज नेशन | 282-290 | 111-126 | 130-138 |
न्यूज 18- IPSOS | 336 | 82 | 124 |
इंडिया न्यूज –पोल स्ट्रॅट | 287 | 128 | 127 |
न्यूज एक्स | 242 | 164 | 136 |
रिपब्लिक – जन की बात | 305 | 124 | 87 |
संबंधित बातम्या :
Tv9 C Voter exit poll Maharashtra : महाराष्ट्रात युतीला 34 जागा
Tv9-C Voter Exit Poll : यूपीत सपा-बसपाची जोरदार मुसंडी, भाजपला भगदाड
Tv9-C Voter Exit Poll : देशात मोदींना बहुमत, काँग्रेस 100 च्या आत!
Tv9 C Voter exit poll Maharashtra : महाराष्ट्रात युतीला 34 जागा