Tv9-C Voter Exit Poll | देशात पुन्हा मोदी सरकार येण्याचे संकेत एक्झिट पोलने दिले आहे. भाजपप्रणित एनडीएला देशात 287 जागा, तर काँग्रेसप्रणित यूपीएला केवळ 128 जागा मिळतील, असा अंदाज Tv9-C Voter च्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एनडीए आणि यूपीए वगळता इतर पक्षांना 127 जागा मिळतील, असेही या एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे.
देशात कुणाला किती जागा?
यामध्ये भाजप पक्षाला 236 जागा आणि भाजपप्रणित एनडीएला 287 जागा मिळतील. म्हणजेच, भाजपला 2014 च्या तुलनेत देशभरात 46 जागांवर फटका बसणार आहे, असे एक्झिट पोलमधून समोर आले आहे.
विशेष म्हणजे, इतर पक्षांमध्ये सपा, बसपा, बीजेडी, टीएमसी, टीडीपी इत्यादी महत्त्वाच्या पक्षांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या जागाही ‘किंगमेकर’ ठरण्याची शक्यता आहे.
इतर पक्षांना किती जागा?
महाराष्ट्रात कुणाला किती जागा मिळतील?
महाराष्ट्रात भाजपला 19, शिवसेनेला 15, काँग्रेस 8 आणि राष्ट्रवादीला 6 जागा मिळतील, असा अंदाज टीव्ही 9 सी व्होटरने व्यक्त केला आहे. गेल्या म्हणजेच 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 22 जागा होत्या यंदा त्यामध्ये 3 जागांची कपात होत आहे. तर शिवसेनेलाही 3 जागांचा फटका बसला आहे. सेनेच्या जागा 18 वरुन 15 वर आल्या आहेत. तर काँग्रेसच्या जागा चौपट वाढल्या आहेत. काँग्रेसला केवळ 2 जागा 2014 मध्ये होत्या त्या आता 8 वर पोहोचण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागाही 2 ने वाढण्याचा अंदाज असून, राष्ट्रवादी 4 जागांवरुन 6 जागांवर पोहोचण्याचा अंदाज आहे.
एग्झिट पोल | भाजप + | काँग्रेस + | इतर |
---|---|---|---|
टीव्ही 9-सी व्होटर | 287 | 128 | 127 |
टाईम्स नाऊ –VMR | 306 | 132 | 104 |
एबीपी-नेल्सन | 267 | 127 | 148 |
न्यूज 24 – टुडेज चाणक्य | 340 | 70 | 133 |
न्यूज नेशन | 282-290 | 111-126 | 130-138 |
न्यूज 18- IPSOS | 336 | 82 | 124 |
इंडिया न्यूज –पोल स्ट्रॅट | 287 | 128 | 127 |
न्यूज एक्स | 242 | 164 | 136 |
रिपब्लिक – जन की बात | 305 | 124 | 87 |