मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याच्या जनतेला आणि एकप्रकारे बंडखोर आमदारांनाच फेसबुक लाईव्हच्या (Uddhav Thackeray Facebook Live Video) माध्यमातून संबोधित केलं. या संबोधनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्री पदाचा उद्धव ठाकरे राजीनामा देणार का? या पार्श्वभूमीवर फेसबुक लाईव्हला महत्त्व प्राप्त झालं होतं. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा (Maharashtra CM News) राजीनामा देण्याची तयारी दाखवली. आपल्या 17.59 सेकंद केलेल्या संबोधनात उद्धव ठाकरेंनी नेमका राजीनामा शब्द किती वेळा उच्चारला? केव्हा उच्चारला? त्यांचं नेमकं वायक्य काय होतं? हे जाणून घेणार आहेत. एकूण जवळपास 18 मिनिटांच्या संबोधनात उद्धव ठाकरेंनी चार वेळा राजीनामा शब्द उच्चारला. तर मुख्यमंत्रिपद सोडण्यासाठी तयार असल्याचा उल्लेखही त्यांनी चार वेळा मुख्यमंत्री पड सोडतो, असं म्हटलं. नेमकी उद्धव ठाकरेंनी ही वाक्य 18 मिनिटांच्या संबोधनामध्ये कधी आली? कोणत्या मिनिटाला आली, याचा टाकलेला हा दृष्टीक्षेप…
10 मिनिटं 56 सेकंद : एकाही आमदाराने सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री पदी नको तर मी राजीनामा देतो. आज हे फेसबुक लाईव्ह संपल्यानंतर वर्षावरुन माझा मुक्कामी मातोश्रीवर हलवतो. मला सत्तेचा मोह नाही.
12 मिनिटं 50 सेकंद ते 12 मिनिटं 59 सेकंद : मी देतो राजीनामा. तुमच्या हातात राजीनामा देतो. आज तयार करतो. तुम्ही या आणि माझं राजीनामा पत्रं द्या. मी नाही जात , कारण मला कोविड झाला. जर राज्यपाल म्हणाले उद्धव ठाकरेंना येऊ द्या ,तर मी यायला तयार आहे.
14 मिनिटं 10 सेकंद ते 14 मिनिटं 16 सेकंद : ज्या शिवसैनिकांना असं वाटत असेल मी शिवसेनेचं नेतृत्व तयार करायला नालायक आहे. तर मी ते पदही सोडायला तयार आहे. शिवसेना पक्षप्रमुख पदही सोडाला तयार आहे. पण हे सांगणारा विरोधक नाही.
14 मिनिटं 30 सेकंद ते 14 मिनिटं 40 सेकंद : मी दोन्ही पदं सोडायला तयार आहे.पण मी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मला आनंदाने मान्य आहे. त्याही पलिकडे जाऊन केवळ मी मुख्यमंत्री नको दुसरा कोणी चालेल तर तेही मला मान्य आहे.
15 मिनिटं 25 सेकंद : मी खूर्ची अडवून ठेवलीय ना. तुम्ही या समोरून सांगा. फोनवरून सांगा. आम्हाला संकोच वाटतोय. पण तुम्ही म्हणाला तसे ‘आम्हाला तुम्ही नको’ असं सांगा. मी या क्षणाला मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे.
16 मिनिटं 29 सेकंद : मला एकही मत माझ्यावरती अविश्वास ठराव दाखवण्याची वेळ येऊ देणार नाही. तुम्ही मला सांगा मी मुख्यमंत्रिपद सोडलं.
वाचा एकनाथ शिंदेच्या बंडाचे LIVE अपडेट्स, इथे क्लिक करा : Eknath Shinde News, Maharashtra Government LIVE