‘लोकशाही देशात टिकली पाहिजे’, उद्धव ठाकरेंची विधानसभा निवडणुकांवर पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Dec 03, 2023 | 11:23 PM

"2024 ची निवडणूक एवढ्यासाठीच महत्त्वाच्या आहेत, आता जशा निवडणुका होत आहेत तशा 2024 नंतरही निवडणुका होत राहिल्या पाहिजेत. जनतेने ठरवावं. यथा राजा तथा प्रजा, अशी पूर्वी म्हण होती, तशी लोकशाहीत यथा प्रजा तथा राजा असं असलं पाहिजे. राजा ठरवण्याचा अधिकार राहिला पाहिजे", असं उद्धव ठाकरे म्हणाले.

लोकशाही देशात टिकली पाहिजे, उद्धव ठाकरेंची विधानसभा निवडणुकांवर पहिली प्रतिक्रिया
मुंब्र्यामध्ये उद्धव ठाकरे यांना येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. मुंब्र्यात मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी देखील बघायला मिळतंय.
Follow us on

मुंबई | 3 डिसेंबर 2023 : देशातील चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल समोर येतोय. चार पैकी तीन राज्यांमध्ये भाजपला मोठा यश मिळालं आहे. निवडणुकांच्या या निकालावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात भाष्य केलं आहे. ठाकरे गटाकडून आयोजित करण्यात आलेल्या नवनियुक्त शिवसेना नेत्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “सत्ता येते जाते, परत येणार. परत आणणार. ठिक आहे, आज चार राज्यांचा निकाल जाहीर झाला. जे जिंकलंय त्यांचं मोठ्या मनाने अभिनंदन करतो. निकाल अपेक्षित, अनपेक्षित ज्याचं ते बघतील. पण जे जिंकले त्यांचं सर्वांचं अभिनंदन. यालाच लोकशाही म्हणतात. अशीच लोकशाही देशात टिकली पाहिजे, यासाठीच आपण लढतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“2024 ची निवडणूक एवढ्यासाठीच महत्त्वाच्या आहेत, आता जशा निवडणुका होत आहेत तशा 2024 नंतरही निवडणुका होत राहिल्या पाहिजेत. जनतेने ठरवावं. यथा राजा तथा प्रजा, अशी पूर्वी म्हण होती, तशी लोकशाहीत यथा प्रजा तथा राजा असं असलं पाहिजे. राजा ठरवण्याचा अधिकार राहिला पाहिजे. पण ते ठरवण्याचा अधिकार हातून जातोय असं जेव्हा वाटायला लागलं तेव्हा आपण लढायला लागलो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘केवळ सत्तेच्या स्वार्थासाठी हे त्यांची धुणीभांडी’

“या देशामध्ये लोकशाही टिकावी यासाठी आम्ही उभे राहिलो आहोत. नाहीतर आमचंसुद्धा काय जातंय? आतासुद्धा ते मिंदे तिकडे गेले आहेत, त्यांना कळत नाही आपण काय करतोय, गद्दार आहेच, पण गद्दारी फक्त शिवसेनेशी नाही तर ते महाराष्ट्राशी आणि महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी करत आहेत. केवळ सत्तेच्या स्वार्थासाठी हे त्यांची धुणीभांडी करत आहेत. त्यांना कळत नाही, तुम्ही विटंबना करत आहेत ते उघड्या डोळ्याने बघत आहेत. त्यामुळे जीव जळतोय”, असं ठाकरे म्हणाले.

‘कदाचित हे 2024 चे शुभ संकेत’

“एक वाक्य होतं बचेंगे तो और भी लढेंगे. बचेंगे क्या? हम लढेंगे और देश को बचाएँगे. लढाई केवळ माझी नाही. पदे येतात जातात, असे सोन्यासारखी शिवसैनिक असल्यावर मला त्याची पर्वा नाही”, असंदेखील उद्धव ठाकरे म्हणाले. “गेल्यावेळी याच निवडणुकांमध्ये छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचा विजय झाला होता. पण लोकसभेत उल्टं झालं होतं. हारलो त्याचं दु:ख असेल, पण कदाचित हे 2024 चे शुभ संकेत आहेत”, असं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. “लोकं एवढी काही मुर्ख नाहीत”, असंही ठाकरे यावेळी म्हणाले.

‘लोकसभेबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक लावू शकतात’

“कारगीलचं युद्ध जिंकल्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका सारख्या झाल्या होत्या. कारण वातावरण आहे, माहौल आहे, निवडणुका घेतल्या. पण वरती आपलं सरकार आलं आणि खाली दांडी उडाली. पण याही वेळेला तसं होण्याची शक्यता आहे. हे जे काही वातावरण झालं आहे त्या वातावरणाचा फायदा किंवा गैरफायदा घेऊन हे लोकसभेबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक लावू शकतात. त्याची तयारी करा”, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं.