मुंबई – शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतलेल्या मुलाखतीनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी सडकून टीका केली आहे. नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या टार्गेटवर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोघेही राहिले आहेत. उद्धव ठाकरे हे कपटी आहेत, आता मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर त्यांचा जळफळाट होतोय, म्हणूनच ही मुलाखत घ्यायला लावली, तसेच संजय राऊत यांच्यामुळेच सरकार पडलं. त्यांनी पवारांनी सांगितलेली कामगिरी चोख बजावली असे घनाघाती आरोप नारायण राणे यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून केले आहेत. त्यावर आता शिवसेनेकडून ही जोरदार प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. मात्र तूर्तास तरी या पत्रकार परिषदेतल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर एक नजर टाकूया…
- उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि त्यांना आता मराठी माणूस, हिंदुत्व आणि शिवसैनिक यांची आठवण येते आहे. अडीच वर्ष त्यांना काही आठवलं नाही. सत्ता गेल्यानंतर हे जळपळणं आणि तडफडणं म्हणतो मी.
- अडीच वर्षांत यांना हिंदुत्व आणि मराठी माणूस आठवला नाही. आजारपण आणि मातोश्री यातच त्यांचं कार्य आहे.
- उद्धव ठाकरे यांना जवळून ओळखतो, त्यांच्या अंगात खोटारडेपणा आणि कपटीपणा आहे. आमदार, खासदार अडचणीत असताना कधी मदत केलीत का. साधे भेटतही नव्हता तुम्ही…
- संजय राऊत मनातून खूश आहे. त्यांच्या गुरुंनी शरद पवारांनी दिलेलं काम फत्ते केलं आहे. संजय राऊतांनी शिवसेनेचं वाट्टोळं केलं. त्यांच्या पत्रकारितेने शिवसेना फुटली. संजय राऊत जोकर. हे नाटकासारखं लिहून देतात आणि उद्धव ठाकरे उत्तरे देतात, प्रश्नही त्यांचे उत्तरंही त्यांचीच.
- एकनाथ शिंदेंना मारण्याची सुपारी नक्षलवाद्यांना दिली होती. रमेश मोरे, जयेंद्र जाधव यांच्या हत्या कोणी केल्या. आपण सेना सोडल्यावर कुणाला सुपाऱ्या दिल्या.देशाबाहेरच्या गँगस्टर्ना सुपाऱ्या दिल्या.
- आता मातोश्रीवर येऊन रिलॅक्स झालात, असं काय परिवर्तन केलं महाराष्ट्रात, मराठी माणसांसाठी काय केलंत.
- आता सत्ता गेल्यावर शिवसैनिक, मेळावे सगळे आठवत आहेत का, दुसऱ्या मातोश्रीचा भविष्यकाळ अजून सुरु झाला नाही.
- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे उद्धव ठाकरेंनी हाल केले. शिवसैनिकांच्या नावावर खोके जमा केले. दंगली झाल्या तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते.
- एकनाथ शिंदेचे नगरविकास खाते आदित्य ठाकरे, रश्मी वहिनी चालवत होते.
- आदित्य ठाकरेंना शेंबूड पुसता येतो का, कुणाला काहीही गद्दार म्हणता, तुम्हा राज्य, देश माहित आहे का,. आता संरक्षण आहे म्हणून हे सुचतंयं. फक्त खोक्यात टाकण्याचं काम माहिती आहे. आजूबाजूचे निघून जातील.
- आधी शिवसेनेचे 18 खासदार आले ती मोदींची कृपा होती, आता शिवसेनेचे 5 ही खासदार येणार नाहीत.
- एकनाथ शिंदेंवर हात टाकण्याची हिंमत आहे का, हात उचला हात काढून टाकतील.
- दिशा सालियम, सुशांतसिंह हे सगळं बाहेर येणार आहे. संरक्षण काढून घेतल्यानंतर हे सगळं कळेल.