विनायक डावरुंग, मुंबई, दि. 6 फेब्रुवारी 2024 | वंदे भारत एक्स्प्रेसची भुरळ सर्वच भारतीय रेल्वे प्रवाशांना पडली आहे. मग वंदे भारतमधून प्रवासाचा आनंद सर्वसामान्यांप्रमाणे राजकारणी लोकही घेत असतात. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस असो की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार असो, यांनीही वंदे भारत रेल्वे प्रवासाचा आनंद घेतला आहे. आता केंद्र आणि राज्य सरकारवर टीकेची एकही संधी न सोडणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास केला. त्यानंतर भाजपने उद्धव ठाकरे यांचा वंदे भारतमधील प्रवासाचा फोटो ट्विट करत तिसरी बार….. मोदी सरकार !, असे दोन शब्दांचे कॅप्शन दिले आहे. भाजपकडून यासंदर्भात दोन फोटो ट्विट केले गेले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चार आणि पाच फेब्रुवारी रोजी कोकण दौऱ्यावर होते. कोकणातून घेतलेल्या सभांमधून उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला. सरकारकडून विकास झाला नाही, असे त्यांनी आपल्या भाषणांमधून टीका केली. त्यानंतर उद्धव ठाकरे संध्याकाळी खेड स्थानकावरुन वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये बसले आणि खेड ते मुंबई प्रवास वंदे भारत एक्स्प्रेसमधून केला.
वंदे भारत एक्सप्रेस ही नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी प्रकल्प आहे. बुलेट ट्रेन आणि वंदे भारत ट्रेनसाठी मोदी सरकारने मोठे काम केले आहे. त्यामुळे भाजपने उद्धव ठाकरे यांच्या वंदे भारत प्रवासाचे दोन फोटो ट्विट केले आहे. पहिल्या फोटोत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत विनायक राऊत दिसत आहे. भाजपने म्हटले आहे की, मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी, वंदेभारत ट्रेनचा आरामदायी प्रवास, तिसरी बार….. मोदी सरकार !
हीच तर #ModiKiGuarantee
कुठे आहे विकास ? म्हणून ओरडणारे उबाठा जेव्हा वंदे भारत ट्रेन मधून प्रवास करून लाभार्थी होतात तेव्हा समाधान वाटतं.
लवकरच बुलेट ट्रेन ची देखील सफर घडवून आणणार हे नक्की कारण #ModiHaiToMumkinHai#विरोधक_देखील_लाभार्थी @ShivSenaUBT_ @OfficeofUT pic.twitter.com/KnznkvNU3d
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 6, 2024
दुसऱ्या एका फोटोवर भाजप महाराष्ट्राकडून कॅप्शन दिले गेले आहे की, कुठे आहे विकास ? म्हणून ओरडणारे उबाठा जेव्हा वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करून लाभार्थी होतात तेव्हा समाधान वाटतं. लवकरच बुलेट ट्रेनची देखील सफर घडवून आणणार हे नक्की कारण…भाजपने हे फोटो उद्धव ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना टॅग केले आहेत.
मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी
वंदेभारत ट्रेनचा आरामदायी प्रवास
तिसरी बार….. मोदी सरकार !#Modikiguarantee pic.twitter.com/xUPFUF1e2z
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 6, 2024
हे ही वाचा
ओल्या काजूची उसळ, बिरड्याची भाजी, कोळंबी भात, पुरण पोळी उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खास मेनू