उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
Image Credit source: TV9 Marathi
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray News) यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. या संवादावेळी त्यांनी शिवसैनिकांना उद्देशून मार्गदर्शन केलं. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्मयंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. या संवादादरम्यान, त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) यांनी पुकारलेल्या बंडावर निशाणा साधताना महत्त्वाचं वक्तव्य केलं. झाडाची फळं मेली, तरी मूळ मरू शकत नाही, असं वक्तव्य त्यांनी केलंय. तसंच मी वर्षावरुन मातोश्रीवर गेलोय. मी मोह सोडलाय. जिद्द सोडलेली नाही, असं देखील ते म्हणाले. बंडखोरांकडून शिवसेना (Shiv sena News) फोडण्याचं काम केलं गेलेल्यांना त्यांनी यावेळी सुनावलं आहे.
वाचा उद्धव ठाकरे यांची मोठी वक्तव्य
- मी जिद्द सोडली नाही, जिद्द अजून कायम आहे- मुख्यमंत्री
- मला सत्तेचा लोभनाही, वर्षा सोडून मातोश्रीवर आलो- मुख्यमंत्री
- ‘मला वाटलं सीएमपदाची खूर्ची हलतेय मात्र ते मानेचं दुखणं होतं’
- पंतप्रधानांकडून शस्त्रक्रियेबद्दल विचारणा- ठाकरे
- कोरोनामुळे डोळ्यात पाणी, ते अश्रू नाहीत- मुख्यमंत्री
- ‘मी बरा होऊ नये म्हणून काही जण पाण्यात देव ठेऊन बसलेले’
- बंडखोरांकडून शिवसेना फोडण्याचं पाप- मुख्यमंत्री
- ‘ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा’
- माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरुन दाखवा- मुख्यमंत्री
- माझं मुख्यमंत्रीपद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा
- झाडाची फुलं न्या, फांद्या न्या, मुळ मात्र नेऊ शकत नाही
- ‘जे सोडून गेले त्याचं मला वाईट का वाटावं?’
- ‘आमदारांना फूस लावून मी सत्तानाट्य का घडवेन?’
- ‘बंडखोर आमदारांसाठी मी काय कमी केलं?’
- ‘बाहेरच्या भाडोत्री लोकांकडून आपल्यात वाद निर्माण करण्याचं काम’
- एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केलं?, नगरविकास खातं दिलं
- माझ्याकडची दोन खाती शिंदेंना दिली- मुख्यमंत्री
- संजय राठोडांवर वाईट आरोप होऊनही मी सांभाळलं- मुख्यमंत्री
- आपलीच काही लोकं घेऊन सेनेवर सोडण्यात आली- मुख्यमंत्री
- सेनेच्या अस्तित्वावर बोलणाऱ्यांना निष्ठा काय असते दाखवावी लागेल
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्यांदा समोर येत आपली भूमिका मांडलीये. एकनाथ शिंदेंच्या बंडाचाच आजचा चौथा दिवस आहे. आतापर्यंत 50 आमदार आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केलाय. तर दुसरीकडे सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये पडू देणार नाही, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं राष्ट्रवादी आणि काँग्रेसने स्पष्ट केलं आहे.
वाचा LIVE घडामोडी : Eknath Shinde vs Shiv Sena LIVE