जळगाव : राज्यभर गाजलेल्या एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिल्याची माहिती आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा संजय राठोड यांच्या मंत्रिपदाबाबत चर्चा सुरु झाली आहे. मंत्रिपदाबाबत संजय राठोड प्रचंड आशावादी असल्याचं पाहायला मिळतंय. जळगावत दौऱ्यात पत्रकारांनी त्यांना मंत्रिपदाबाबत प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील, असं म्हणत मंत्रिपदाबाबतचा आशावाद व्यक्त केला.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी वन मंत्रालयाचा राजीनामा द्यावा लागलेले शिवसेना आमदार संजय राठोड यांचं पुन्हा मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याचे संकेत मिळत आहेत. कारण संजय राठोड विविध भागांचा दौरा करुन समाजातल्या नागरिकांचे प्रश्न ऐकून घेत आहेत. वाड्या-वस्त्या-तांड्यावर जाऊन तांड्यावर जावून समाज बांधवांशी चर्चा करीत आहेत. याच दरम्यान शिवसेनेच्या गोटातही त्यांच्या मंत्रिपदाबाबत चर्चा सुरु झाली आहे.
माझ्या मंत्रिपदाबाबत विरोधकांनी कितीही विरोध केला तरी अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असं माजी मंत्री संजय राठोड जळगावात बोलताना म्हणाले. राठोड सद्या खानदेश दौऱ्यावर आहेत. आज ते जळगावात होते.
आपल्या समाज्याच्या प्रश्नासाठी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहोत. तांड्यावर जावून समाज बांधवांशी चर्चा करीत आहोत. त्यांना काय हवं नको, ते मी सध्या पाहत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माझ्या मंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय घेतील, असं राठोड म्हणाले.
भाजपच्या चित्रा वाघ यांनी त्यांच्या मंत्रिमंडळ समावेश करण्यास विरोध केला आहे. यावर बोलताना संजय राठोड म्हणाले, “कुणी कसाही विरोध केला तरी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहे”. म्हणजेच ते एकप्रकारे उद्धव ठाकरे यांना सांगू पाहतायत की विरोधकांच्या विरोधाला न जुमानता मंत्रिमंडळातल्या समावेशाबाबत निर्णय घ्या, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे का या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, “या बाबत आपण एकदा बोललो आहोत.प्रकरणाची पोलीस चौकशी सुरु आहे. योग्य वेळ येईल तेव्हा मी निश्तितपणे बोलेल.”
(Uddhav Thackeray Will Final Decision Over Ministry Says Sanjay Rathod)
हे ही वाचा :
तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांची क्लीन चिट?
माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील: संजय राठोड
…म्हणून मी मंत्रिपद सोडलं, संजय राठोड यांची राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रिया