‘हिंदू महिलांनी फिगर मेन्टेन करणं सोडा, 4 मुलं….’, महामंडलेश्वर प्रेमानंद महाराजांच वादग्रस्त वक्तव्य

| Updated on: Jul 26, 2024 | 11:06 AM

Mahamandaleshwar Swami Premananda Maharaj : पंचायती अखाडा श्री निरंजनीचे महामंडलेश्वर स्वामी प्रेमानंद महाराज यांनी हिंदू महिलांबद्दल काही वक्तव्य केली आहेत. श्रीमद् भागवत कथा कार्यक्रमात बोलताना त्यांनी केलेली ही वक्तव्य आता चर्चेत आहेत. स्वामी प्रेमानंद यांनी एका वर्ग विशेषच्या लोकसंख्येवरुनही टिप्पणी केली.

हिंदू महिलांनी फिगर मेन्टेन करणं सोडा, 4 मुलं...., महामंडलेश्वर प्रेमानंद महाराजांच वादग्रस्त वक्तव्य
mahamandaleshwar swami premananda maharaj
Follow us on

धार्मिक नगरी उज्जैनमध्ये बडनगर रोडवर श्रीमद् भागवत कथा कार्यक्रमात महामंडलेश्वर स्वामी प्रेमानंद महाराज यांनी एक वक्तव्य केलं आहे. त्यांनी हिंदू महिलांना चार मुलं जन्माला घालण्याचा सल्ला दिला आहे. स्वामी प्रेमानंद यांनी एका वर्ग विशेषच्या लोकसंख्येवरुनही टिप्पणी केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, ते असही म्हणाले की, “महिला आपली फिगर मेन्टेन करण्याच्या मागे लागल्या आहेत. त्याचवेळी दुसरा समाज 8 मुलं जन्माला घालतोय”

पंचायती अखाडा श्री निरंजनीचे महामंडलेश्वर स्वामी प्रेमानंद महाराज यांचा सध्या बडनगर रोडवरील मोहनपुरा येथील श्री बाबाधाम मंदिरात श्रीमद भागवत कथेचा कार्यक्रम सुरु आहे. कथा वाचनाच्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी उपस्थित लोकांना हिंदुस्तानला हिंदुस्तान म्हणून कायम ठेवण्याच आवाहन केलं. महिला भक्तांना संबोधित करताना ते म्हणाले की, “तुम्हाला हे ऐकायला थोडं वेगळं वाटेल, पण हिंदू धर्माला धोका आहे. आता ती वेळ आलीय, जेव्हा तुम्हाला सनातन संस्कृतीला वाचवण्यासाठी क्षत्राणी बनावं लागेल”

‘दुसऱ्या समाजाचे लोक 8-8 मुलं जन्माला घालत आहेत’

महामंडलेश्वर यांनी वर्ग विशेषवर निशाणा साधला. “आज भले आपण त्यांना अल्पसंख्याक म्हणत असू, पण तो दिवस दूर नाही, जेव्हा कश्मीरप्रमाणे आपण अल्पसंख्याक बनून जाऊ” महामंडलेश्वर महाराजांनी कथे दरम्यान वक्तव्य केली. “हिंदुंनी 4 मुलं जन्माला घातली पाहिजेत. महिलांनी कमीत कमी 4-4 मुलांना जन्माला घातलं पाहिजे. दुसऱ्या समाजाचे लोक 8-8 मुलं जन्माला घालत आहेत, आणि आमच्या माता फिगर मेन्टेनच्या चक्रात अडकल्या आहेत. जर तुमचं 2 मुलांच टार्गेट आहे आणि तुम्ही 3 मुलं जन्माला घालत असाल, तर चिंता करण्याची गरज नाही. तिसऱ्या मुलांचा सांभाळ आम्ही करु” असं महामंडलेश्वर महाराज म्हणाले.

‘अन्यथा हिंदुस्तानचा इंडोनेशिया होऊन जाईल’

“अर्ध उत्तर प्रदेश हातातून निघून गेलय. तिथले 17 जिल्हे हिंदू धर्माचे राहिलेले नाहीत. पश्चिम बंगालची सुद्धा अशीच हालत आहे. बंगालचे लोक सुद्धा याच समस्येचा सामना करतायत. आसामच्या 5 लाख लोकांकडे कुठलाही पासपोर्ट-वीजा नाहीय” असं महामंडलेश्वर महाराज म्हणाले. श्रीमद् भागवत कथे दरम्यान ते लोकांना म्हणाले की, “तुम्ही आता जागे झाला नाहीत, तर हिंदुस्तानचा इंडोनेशिया बनायला वेळ लागणार नाही. वर्ग विशेषवर टिप्पणी करताना ते म्हणाले की, 25 वर्षापूर्वी ते 2 कोटी होते. त्यानंतर 9 कोटी झाले. आता 38 कोटी झालेत. अजूनही वेळ निघून गेलेली नाही. वेळीच जागे व्हा, अन्यथा हिंदुस्तानचा इंडोनेशिया होऊन जाईल”