मुंबई : निवडणूक आयोगाने 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची (5 State Assembly Election) घोषणा केल्यानंतर उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. गोव्यात भाजपच्या 6 बडे नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. तर उत्तर प्रदेशात स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) या कॅबिनेट मंत्र्यांनी राजीनामा देत समाजवादी पक्षात प्रवेश केलाय. योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर प्रदेशात योगी सरकारला अजून मोठे धक्के बसण्याचा दावा केला आहे.
शरद पवार यांना स्वामी प्रसाद मौर्य यांच्या भाजपला रामराम ठोकत समाजवादी पार्टीतील प्रवेशाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी शरद पवार यांनी मौर्य यांच्यासोबत अजून काही आमदारही पक्ष सोडणार असल्याचं कळतं. त्यामुळे उत्तर प्रदेशात यावेळी परिवर्तन होणार आहे, असा दावा शरद पवार यांनी केलाय. महत्वाची बाब म्हणजे यावेळी शरद पवार यांनी 13 आमदार समाजवादी पार्टीत प्रवेश करणार असल्याचं मोठं भाकित पवार यांनी केलं आहे.
13 MLAs are going to join Samajwadi Party (SP): NCP chief Sharad Pawar on Uttar Pradesh minister Swami Prasad Maury resigning and joining SP pic.twitter.com/ZZJnAQRvba
— ANI (@ANI) January 11, 2022
‘उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीसोबत राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. उद्या एक मोठी बैठक होत आहे. तिथे आमचे प्रदेशाध्यक्ष के.के शर्मा सहभागी होतील. उद्या लखनऊमध्ये जागावाटपाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात आम्ही तिथे जाणार आहोत. उत्तर प्रदेशात परिस्थितीत मोठा बदल होत आहे. मला आनंद आहे की मेहंदी साहेब जे उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत. त्यांनी गांधी, नेहरूंच्या विचाराने राजकारण केलं. ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे अनेक साथीदार पक्षात येत आहेत’, असा दावाही पवार यांनी पत्रकार परिषदेत केलाय.
उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार आहे. उत्तर प्रगदेशात लोकांना बदल अपेक्षित आहे. तिथे जो एक सांप्रदायिक विचार मजबूत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तिथल्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य मी ऐकलं की 80 टक्के लोक आमच्यासोबत आहेत. 20 टक्के फक्त आमच्यासोबत आहेत. अशाप्रकारचं वक्तव्य देशाच्या अल्पसंख्याक समुदाला ठेस पोहोचवणारं आहे. हे वक्तव्य एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला शोभा देत नाही. देशात सेक्युलर विचार मजबूत करायचा असेल, एकतेला ताकद द्यायची असेल तर असा विचार, अशी भूमिका समाजहिताची नाही. त्यामुळे मला वाटतं की उत्तर प्रदेशातील जनता त्यांना धडा शिकवेल, असं मोठं वक्तव्य पवार यांनी केलंय.
इतर बातम्या :