UP जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कमळ फुललं, 75 पैकी 67 जागांवर भाजप, उपमुख्यमंत्री म्हणाले, SP साफ, BJP टॉप!

| Updated on: Jul 04, 2021 | 7:22 AM

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी (UP VidhanSabha Election 2022) सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीच्या निकालात भाजपची सरशी झालेली आहे. (UP District ZP president Election Result)

UP जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कमळ फुललं, 75 पैकी 67 जागांवर भाजप, उपमुख्यमंत्री म्हणाले, SP साफ, BJP टॉप!
भाजप
Follow us on

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी (UP VidhanSabha Election 2022) सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीच्या निकालात (ZP president Election Result) भाजपची सरशी झालेली आहे. उत्तर प्रदेशमधील 75 पैकी 67 जागांवर भाजपचा उमेदवार आता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहे. या यशापाठीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता हे कारण असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी जिल्हा परिषदेत मिळालेल्या यशाबद्दल मुख्यमंत्री योगी आणि भाजप पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. (UP District ZP president Election Result BJP Won 67 Out of 75 Massive Victory Yogi Adityanath Tweet)

SP साफ, BJP टॉप

जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी शनिवारी 53 जिल्ह्यात मतदान पार पडलं. त्याचबरोबर इटावा वगळता 21 जागांवर बिनविरोध निवडणूक पार पडली. जिल्हा पंचायत अध्यक्षपदासाठी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत मतदान घेण्यात आले. भाजपाच्या या निर्विवाद विजयाबद्दल उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी योगींची लोकप्रियता, त्यांची निर्णय घेण्याची पद्धत, मोदींची लोकप्रियता आणि त्यांच्या सर्वसामान्य लोकांपर्यंतच्या स्तुतीपर योजना, नेते आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा, मेहनत यामुळे भाजपा जिंकल्याचं म्हटलं. मौर्य यांनी भाजपच्या विजयानंतर ट्विट करुन समाजवादी पक्षावर निशाणा साधला आहे. एसपी साफ, भाजप टॉप…, असं ट्विट त्यांनी केलं तर लोकांचा सुशासनवर विश्वास आहे असल्याचं ट्विट योगींनी केलं.

आजम खान यांच्या गडावर भाजपची चढाई

अमेठीतील राजेश मसालाचे मालक राजेश अग्रहरी विजयी झाले आहेत. भाजपने राजेश अग्रहरी यांना तिकीट दिले होते. आझम खान यांचाचा बालेकिल्ला असलेल्या रामपूर येथेही भाजपाने बाजी मारली आहे. पक्षाचे उमेदवार ख्यालीराम लोधी येथून जिल्हा पंचायत अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. ख्यालीराम लोधी यांना 18 मते मिळाली आहेत. समाजवादी समर्थित उमेदवार नसरीन जहां यांना 13 मते मिळाली. कुशीनगरमध्येही भाजपाने विजय मिळविला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदावर यापूर्वीच भाजपचाच ताबा होता. आताही भाजपचा विजय झाला आहे.

शनिवारी या 53 जागांवर झालं मतदान

उत्तर प्रदेशातील चंदोली, हापूर, सुलतानपूर, मिर्जापूर, रायबरेली, मथुरा, फिरोजाबाद, बिजनोर, हमीरपूर, मुजफ्फरनगर, सोनभद्र, बलिया, गाझीपूर, उन्नाव, हरदोई, सांभल, बस्ती, फतेहपूर, शामली, अलिगड, जोनपूर, कासगंज, आजमगड, सिद्धार्थनगर, एटा, अयोध्या, रामपूर, सीतापूर, औरैया, महोबा, फतेहपूर, कानपूर नगर, कुशीनगर, मेनपुरी, प्रतापगड, कन्नौज, जालौन, महाराजगंज, संत कबीरनगर, लखीमपूर, बदायूं, प्रयागराज, अमेठी, भदोही, बाराबंकी, फर्रुखाबाद, कानपूर देहात, आंबेडकर नगर, बरेली, कौशांबी, हाथरस, देवरिया आणि लखनऊ येथे जिल्हा पंचायत अध्यक्षपदासाठी मतदान झाले.

(UP District ZP president Election Result BJP Won 67 Out of 75 Massive Victory Yogi Adityanath Tweet)

हे ही वाचा :

महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कोणती?, रोहित पवारांनी एका ट्विटमधून पडळकरांना समजून सांगितली!

“… तर भाजप विचार करेल” संजय राऊत-आशिष शेलारांच्या भेटीनंतर भाजपच्या बड्या नेत्याचं सूचक विधान