दिल्ली : उत्तर प्रदेशात येत्या 25 मार्चला योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. उत्तर प्रदेशवर योगी आदित्यनाथ यांची सलग दुसऱ्यांदा सत्ता आल्याने या शपथविधी सोहळ्याकडे देशभराचं लक्ष लागून आहे. मात्र, या पूर्वी सोमवारपासून ते मंगळवारपर्यंतच्या 24 घंट्यामध्ये उत्तर प्रदेशातील तीन बड्या नेत्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यांमध्ये सर्वात मोठे नाव योगी आदित्यनाथ यांचे आहे. तर दुसरा राजीनामा समाजवादी पक्षाचे (Samajvadi Party) अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि तिसरा राजीनामा आजम खान यांचा आहे. योगी आदित्यनाथ यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे अखिलेश यादव आणि आजम खान यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेशमधील या तिन्ही बड्या नेत्यांच्या राजीनाम्यांची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे. या तिन्ही बड्या नेत्यांनी का राजीनामा दिला. यामागचे काय कारण आहे. जाणून घेऊया.
उत्तर प्रदेशचे काळजीवाहून मुख्यमंत्री योगी आत्यनाथ यांनी सोमवारी रात्री विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. योगी आदित्यनाथ हे गोरखपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. दरम्यान, 2017 विधानसभा निवडणुकीनंतर योगी आदित्यनाथ यांना विधिमंडळ पक्षा नेता म्हणून निवडण्यात आलं होतं. त्यावेळी ते गोरखपुरचे खासदार होते. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते विधानपरिषदेचे बिनविरोध सदस्य म्हणून निवडणून आले. त्यांनी विधान परिषदेच्या कार्यकाळातच मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. दुसऱ्यांना योगी आदित्यनाथ यांना निवडणूक लढवण्याचं ठरवलं. त्यावेळी योगी यांनी गोरखपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यावेळी योगी आदित्यनात यांनी समाजवादी पक्षाच्या सुभावती शुक्ला यांना 1 लाख पेक्षा अधिक मतांनी पराभूत केलाय. आता योगी आदित्यनाथ यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यावेळी विधानसभा निवडणूक करहल विधानसभा मतदारसंघातून लढवली. त्यांना या जागेवरुन भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री एसपी बघेल यांना पराभूत केलं. अखिलेश यादव आझमगडमधून खासदार होते. आता लोकसभेत समाजवादी पक्षाच्या पाच जागा आहेत. यातच असं मानलं जात होतं की अखिलेश यादव हे विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतील. पण त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. जाणकारांच्या मते अखिलेश यादव हे 2027 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी करतायेत. यात ते आमदार राहून राज्यातील राजकारणावर फोकस करत आहेत.
समाजवादी पक्षाचे नेता अखिलेश यादव यांच्यासोबत आजम खान यांनी देखील लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यावेळी आजम खान हे रामपूर विधानसभेच्या जागेवरुन लढले होते. रामपूर विधानसभेतून ते जिंकलेही. आता आजम खान यांनी देखील अखिलेश यादव यांच्याप्रमाणे राज्यातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. आता अखिलेश यादव आणि आजम खान यांच्या राजीनाम्यानंतर लोकसभेतील दोन जागा खाली झाल्या आहेत. यातच या दोन्ही जागेवर निवडणुका होण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या