नवी दिल्ली: देशातील अनेक राज्यात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कोरोना लसीची निर्यात न करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच देशात व्हॅक्सीनचा तुटवडा आहे ही गंभीर समस्या आहे. हा उत्सव करण्याचा विषय नाही, असा चिमटाही राहुल गांधी यांनी काढला आहे. (Vaccine shortage not ‘festival’: Rahul Gandhi’s dig at PM Modi)
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चिठ्ठी लिहून ही मागणी केली आहे. तसेच कोरोना लसीकरणाचा तुटवडा आणि वाढत्या संसर्गातून बाहेर पडण्यासाठी राहुल यांनी मोदींना सल्लेही दिले असून दुसऱ्या देशात लस निर्यात करण्यात येत असल्याबद्दल प्रश्नही उपस्थित केले आहेत.
काय म्हटलंय चिठ्ठीत
आपल्या देशातील लोक व्हॅक्सीनच्या तुटवड्यामुळे त्रस्त झाले आहेत. तरीही आम्ही दुसऱ्या देशांना लस निर्यात करत आहोत. 6 कोटींपेक्षा अधिक लस इतर देशांना देण्यात आल्या आहेत. लस निर्यात करण्याचा हा निर्णय सरकारच्या इतर निर्णयाला ओव्हरसाईट करणारा आहे की देशातील लोकांचा जीव धोक्यात घालून निर्यातीच्या नावाखाली पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न आहे? असा सवाल राहुल यांनी केला आहे.
केंद्राला सल्ला
>> व्हॅक्सीनची कमतरता कमी करण्यासाठी व्हॅक्सीन सप्लायर्सला आवश्यक ती सामुग्री देण्याची गरज आहे
>> दुसऱ्या देशांना व्हॅक्सीन निर्यात करणं त्वरीत बंद करा
>> व्हॅक्सीनसाठी फास्ट ट्रॅक अप्रुव्हल द्यायला हवं
>> मागेल त्याला लस द्यायला हवी
भेदभाव करू नका
राहुल गांधी यांनी ट्विट करूनही सरकारवर टीका केली आहे. कोणताही भेदभाव न करता केंद्राने राज्यांना मदत केली पाहिजे, असं राहुल यांनी म्हटलं आहे. वाढत्या कोरोनाच्या संकटात व्हॅक्सीनची कमतरता ही एक अतिगंभीर समस्या आहे. तो उत्सव नाही. अशावेळी आपल्या देशातील लोकांचा जीव धोक्यात घालून व्हॅक्सीनची निर्यात करणं कितपत योग्य आहे? केंद्राने कोणताही पक्षपात न करता सर्वच राज्यांना कोरोना लसीचा मुबलक साठा दिला पाहिजे. आपल्याला सर्वांना मिळून या संकटाविरुद्ध लढायचं आहे, असंही त्यांनी सांगितलं. (Vaccine shortage not ‘festival’: Rahul Gandhi’s dig at PM Modi)
VIDEO : SuperFast 100 News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 9 April 2021https://t.co/C0UClMrRE4
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 9, 2021
संबंधित बातम्या:
तुरुंगाच्या जमिनीवर पेट्रोल पंप उभे राहणार, 400 कैद्यांना मिळणार काम, ‘या’ राज्यानं घेतला निर्णय
आता संपूर्ण लॉकडाऊनची गरज नाही, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोदींचं स्पष्टीकरण
(Vaccine shortage not ‘festival’: Rahul Gandhi’s dig at PM Modi)