भाजपमधून राष्ट्रवादीत घरवापसी करणार का? वैभव पिचड म्हणतात…

| Updated on: Aug 17, 2020 | 1:41 PM

भाजप नेते आणि माजी आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याच्या चर्चेवर सावध पवित्रा घेतला आहे (Vaibhav Pichad on returning to NCP from BJP).

भाजपमधून राष्ट्रवादीत घरवापसी करणार का? वैभव पिचड म्हणतात...
Follow us on

अहमदनगर : भाजपचे नेते आणि माजी आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याच्या चर्चेवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या वैभव पिचड यांच्यासह भाजपमध्ये गेलेल्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या घरवापसीची चर्चा सुरु होती. यावर वैभव पिचड म्हणाले, “माझ्याशी अद्याप कुणाचाही संपर्क झालेला नाही. मी सध्या तरी दिल्या घरी खुश आहे” (Vaibhav Pichad on returning to NCP from BJP). वैभव पिचड यांनी यावेळी ‘सध्या’ या शब्दाचा प्रयोग केल्यामुळे त्यांनी सावध पवित्रा घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

वैभव पिचड म्हणाले, “काल परवा काही वृत्तवाहिन्यांनी ज्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ते पुन्हा आधीच्या पक्षात परतणार असल्याच्या बातम्या दाखवल्या. यात माझाही फोटो दाखवून तसं सांगण्यात आलं. मात्र, मी अनेक वृत्तवाहिन्यांशी संपर्क करुन माझा खुलासा केला आहे. माझ्याशी अद्याप कुणाचा संपर्कही झालेला नाही. तसेच माझा सध्या घरवापसीचा कोणताही प्रश्न उपस्थित होत नाही. मी आहे त्या घरात सध्या तरी खुश आहे.”

माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड यांनी विधानसभेपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आता त्यांच्या घरवापसीच्या चर्चेवर वैभव पिचड यांनी सध्या तरी असा कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट केलंय.

दरम्यान, राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले आमदार परत राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक असल्याचं म्हटलं होतं. ते म्हणाले होते, “निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीमध्ये परतण्यास उत्सुक आहेत. मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याविषयी लवकरच निर्णय घेऊन घोषणा करण्यात येईल.”


राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले तत्कालीन आमदार

राणा जगजितसिंह पाटील – तुळजापूर, उस्मानाबाद – पुन्हा विजयी
बबनराव पाचपुते
 –  श्रीगोंदा, अहमदनगर – पुन्हा विजयी
वैभव पिचड –  अकोले, अहमदनगर – पराभूत (आता आमदार नाही)

नमिता मुंदडा – केज, बीड (आधी आमदार नव्हत्या, आता विजयी)

नमिता मुंदडा यांच्याविषयी फारच रंजक गोष्ट घडली होती. शरद पवार यांनी मुंदडा यांना केजमधून उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यानंतर मुंदडा यांनी पक्षाला रामराम ठोकला आणि भाजपचा झेंडा हाती धरला. त्या याआधी आमदार नव्हत्या. परंतु भाजपच्या तिकीटावर त्या निवडून आल्या आहेत.

राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये गेलेले तत्कालीन आमदार

भास्कर जाधव –  गुहागर, रत्नागिरी – पुन्हा विजयी
जयदत्त क्षीरसागर – 
बीड, बीड – पराभूत (आता आमदार नाही)
पांडुरंग बरोरा
 – शहापूर, ठाणे – पराभूत (आता आमदार नाही)
दिलीप सोपल – राष्ट्रवादी ते शिवसेना – बार्शी, सोलापूर – पराभूत (आता आमदार नाही)

रश्मी बागल – करमाळा, सोलापूर – (आधी आमदार नव्हत्या, निवडणुकीतही पराभूत)
शेखर गोरे – माण, सातारा – (आधी आमदार नव्हते, निवडणुकीतही पराभूत)

संबंधित बातमी :

शरद पवारांची साथ सोडलेल्या आमदारांचं काय झालं?

राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा, नवाब मलिक म्हणतात…

संबंधित व्हिडीओ :


Vaibhav Pichad on returning to NCP from BJP