VVMC Election 2022 Ward 11 | वसई विरार महापालिका निवडणूकीत प्रभाग 11 मध्ये कोणता पक्ष वरचढ ठरणार, वाचा सविस्तर

| Updated on: Aug 16, 2022 | 10:51 AM

वसई विरार महापालिकेची निवडूक दरवेळी चर्चेची ठरते. महापालिकेत अनुसूचित जातीसाठी 5, अनुसूचित जमातीसाठी 6 आणि महिलांसाठी 63 जागा राखीव आहेत. अनिलकुमार पवार हे महापालिकेचे आयुक्त आहेत. आमदार हिंतेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची पालिकेत सत्ता आहे.

VVMC Election 2022 Ward 11 | वसई विरार महापालिका निवडणूकीत प्रभाग 11 मध्ये कोणता पक्ष वरचढ ठरणार, वाचा सविस्तर
Follow us on

मुंबई : वसई विरार (Vasai Virar) महापालिकेच्या निवडणूका अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. प्रभागांमध्ये निवडणूकीचे वारेही वाहू लागले आहे. इच्छुकांनी मोर्चे बांधणी करण्यासही सुरूवात केलीयं. यंदा आरक्षणांमध्ये मोठे बदल केल्याने अनेकांचे स्वप्न मातीत मिसळले असून अनेकांनी हिच सुवर्णसंधी म्हणून कामास सुरूवात देखील केलीयं. बदललेल्या आरक्षणामुळे (Reservation) अनेक प्रस्थापितांना आपले प्रभाग सोडून इतर नवीन प्रभागातून निवडणूक लढण्याची वेळ देखील आलीयं. वसई विरार महापालिकेची लोकसंख्या (Population) 12,34,690 इतकी आहे. तर अनुसूचित जातीची लोकसंख्या 51,468 आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या 58,608 इतकी आहे. वसई-विरार महापालिकेची सदस्य संख्या 126 आहे. महापालिकेत एकूण 42 प्रभाग आहेत.

भाजपा     
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

बहुजन विकास आघाडीची पालिकेत सत्ता

वसई विरार महापालिकेची निवडूक दरवेळी चर्चेची ठरते. महापालिकेत अनुसूचित जातीसाठी 5, अनुसूचित जमातीसाठी 6 आणि महिलांसाठी 63 जागा राखीव आहेत. अनिलकुमार पवार हे महापालिकेचे आयुक्त आहेत. आमदार हिंतेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची पालिकेत सत्ता आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये संजय दिगंबर पिंगुळकर हे नगरसेवक आहेत. विरार पोस्ट ऑफिस पूर्व, रानळे तलाव, स्वागत अॅकॅडमी स्कुल, नाना नानी पार्क, गिताजली स्कुल, गुरुकृपा हॉस्पिटल, मनवेलपाडा तलाव, मोहक सिटी, डिमार्ट, चैतन्य हॉस्पिटल पर्यंत प्रभाग आहे.

भाजपा     
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

आरक्षण बदलामुळे बदलले संपूर्ण राजकिय गणित

प्रभाग क्रमांक 11 ची एकून लोकसंख्या ही 28665 इतकी आहे. पुढे उत्तरेला तारवाडी स्नेहांजली इमारत ते सेंट पिटर स्कुलची दक्षिणेकडील बाजू ते स्वागत अॅकॅडमी स्कुल ते वल्लभ अपार्टमेंट ते गुरुदत्त नगर ते निराबाई संकुल ते आत्माराम पाटील यांच्या घराची मागची बाजू. आत्माराम पाटील यांच्या घराची मागची बाजू ते नॅशनल हायस्कुल ते कारगील नगर रिक्षा स्टँण्ड ते एकविरा दर्शन इमारत डी. पी. रस्ता ते मनवेलपाडा तलाव ते सॉलिटीअर अपार्टमेंट पर्यंत.सॉलिटिअर अपार्टमेंट ते श्री. गजानन सिंह हायस्कुल पर्यंत.गजानन सिंह हायस्कुल ते रेल्वे समांतर हद्द ते तारवाडी स्नेहांजली इमारती पर्यंत प्रभाग आहे.

भाजपा     
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष