सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर राज्यातील मंदिरं खुली करावी या मागणीसाठी पंढरपूर येथे आंदोलन केलं (Prakash Ambedkar strike in Pandharpur). त्यांनी आपल्या मोजक्या कार्यकर्त्यांसह पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात प्रवेश करुन आंदोलन केलं. यावेळी बोलताना त्यांनी उपस्थित वारकऱ्यांना आणि नागरिकांना आजपासून मंदिरं खुली आहेत असं समजून दर्शन घेण्याचं आवाहन केलं. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी पोलीस बंदोबस्त असला तरी आम्ही आमचं आंदोलन करणारच अशी भूमिका घेतली होती.
LIVE Updates:
LIVETV – पंढरपूरमधून प्रकाश आंबेडकर लाईव्ह https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/1PUtiaEXf1
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 31, 2020
पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या पश्चिम गेटवर प्रकाश आंबेडकर, विश्व वारकरी सेना आणि इतरांचे स्वागत करण्यात आले. pic.twitter.com/EBQoYYyf3Z
— Prabuddh Bharat (@PrabuddhBharat2) August 31, 2020
हेही वाचा : भाजपने माणसातला देव ओळखला नाही, ‘मंदिरं उघडा’ आंदोलनावरुन विजय वडेट्टीवारांची टीका
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “पंढरपूरमध्ये पोलीस बंदोबस्त असला तरी आम्ही आमचे आंदोलन करणार आहोत. आमच्या आंदोलनानंतर राज्यातील सर्व मंदिर खुली होतील. यापुढे मंदिरं खुली करण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. मी सरकारला मंदिरं खुली करण्यासाठी पटवून सांगणार आहे.” यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवरही सडकून टीका केली. भाजपने घंटानाद करण्यापेक्षा केंद्र सरकारला सांगावं आणि मंदिरं खुली करण्याचे आदेश देण्याची मागणी करावी, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा : जो उत्साह दारु दुकाने उघडताना दाखवला, त्याच्या अर्धा तरी मंदिरं उघडण्यासाठी दाखवा : देवेंद्र फडणवीस
दरम्यान याआधी प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला मंदिरं खुली करा अन्यथा पंढरपूरमध्ये आंदोलन करु असा इशारा दिला होता. “दारु, गुटख्याची दुकानं चालू असताना विठ्ठल मंदिर बंद का? असा सवाल विश्व वारकरी सेनेचे संस्थापक ह.भ.प. अरुण महाराज बुरघाटे आणि ह.भ.प. शेट्ये महाराज यांनी सरकारला विचारला आहे. यावर राज्य सरकार प्रतिसाद देत नसल्याने 31 ऑगस्टला समस्त वारकरी बांधवांनी मोठ्या संख्येने पंढरपूरला जमावे,” असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं.
संबंधित बातम्या :
मंदिरांवर अनेकांचे उदरनिर्वाह, देव मंदिरात बंदिस्त व्हावे ही सरकारची भूमिका नाही : संजय राऊत
मंदिरात जाऊन देवदर्शन घेणं, हा प्रत्येकाच्या श्रध्देचा भाग, यात राजकारण करु नये – राजेश टोपे
Pandharpur Temple | विठ्ठल मंदिर दर्शनासाठी उघडा, वारकऱ्यांची सरकारकडे मागणी
संबंधित व्हिडीओ :