मुंबई: विद्या चव्हाण या राष्ट्रवादीच्या आमदार आहेत. नगरसेवक ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांनी जेजे स्कूल ऑफ आर्ट्समधून सिरॅमिक आणि कमर्शिअल आर्ट्समध्ये पदवी घेतली. पुढे स्टुडिओ टाकून आपली उपजिवीका सुरू ठेवण्याचा त्यांचा मानस होता. मात्र, काळाला ते मंजूर नव्हतं. ज्येष्ठ समाजवादी नेत्या, ‘पाणीवाली बाई’ मृणालताई गोरेंच्या संपर्कात आल्या आणि त्यांच्या आयुष्याला टर्निंग पॉईंट मिळाला. विद्याताईंचा राजकीय प्रवास कसा आहे? त्यावर टाकलेला हा प्रकाश. (Veteran social activist mrinal gore changed my life, says vidya chavan)
विद्या चव्हाण यांची घरची परिस्थिती चांगली होती. त्यांचे वडील न्यायाधीश होते. त्यामुळे त्यांची सतत बदली व्हायची. त्या निमित्ताने त्यांना अनेक गावे पाहता आली. त्यामुळे वेगवेगळ्या गावांमध्ये त्यांचं शिक्षण होत होतं. वांद्रे स्फूल ऑफ आर्टस आणि जेजे स्कूल ऑफ आर्ट्समधून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. त्यांनी पदवी घेतल्यानंतर स्टुडिओ उभारला. पण त्याच काळात देशात धार्मिक राजकारणास सुरुवात झाली. त्यामुळे राजकारणात धर्म आल्यावर गरीबांचे प्रश्न कोण सोडवणार? असा प्रश्न विद्या चव्हाण यांना पडला आणि तोच त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. त्यानंतर त्यांनी हा सिरॅमिकचा स्टुडिओ बंद केला आणि सक्रिय राजकारणात प्रवेश केला.
1992-93चा तो काळ होता. त्याकाळात देशात बाबरी मशीद पडली होती. देशभर दंगली सुरू झाल्या होत्या. त्यानंतर गोध्रा कांड घडले आणि संपूर्ण देशात धर्मकारणाने डोकं वर काढलं. हिंदू-मुस्लिम अशी देशात विभागणी होताना दिसत होती. त्यावेळी त्या पार्ल्यात राहत होत्या. तेव्हा एक दिवस अचानक त्यांची मृणाल गोरे यांच्याशी भेट झाली. त्यांच्याशी राजकारण, धर्मकारण या विषयावर त्यांच्या चर्चा झाली. नंतर त्या वारंवार मृणाल गोरे यांच्या संपर्कात आल्या आणि त्यांच्याशी या विषयावर चर्चा घडू लागल्या. मृणालताईंच्या टोपीवाला बंगल्यात या चर्चा व्हायच्या. याचवेळी मृणालताईंचं निरीक्षण करणंही त्यांचं सुरू होतं. मृणालताई बोलतात कशा? विषयाची कशी मांडणी करतात आणि लोकांचे प्रश्न समजून त्या कशा सोडवतात, याचं त्यांनी निरीक्षण केलं आणि मृणालताईंबाबत आकर्षण वाढून त्यांच्यासोबत त्यांनी कामही सुरू केलं आणि त्यांचं राजकारणात पहिलं पाऊल पडलं. त्यानंतर त्यांनी मृणालताईंच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या महिला मंडळ नावाच्या संघटनेत काम सुरू केलं.
त्याच काळात जळगाव येथील सेक्स स्कँडल घडले. या सेक्स स्कँडलमुळे महाराष्ट्र हादरून गेला. महाविद्यालयीन तरुणींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पण त्याविरोधात कोणी काही बोलत नव्हतं. त्यामुळे विद्या चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काही ग्रुप तयार केले. हा ग्रुप कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थीनींशी संपर्क साधून त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करत होता. त्यातून माहिती मिळत गेली आणि या प्रकरणाला वाचा फुटली.
विद्याताईंनी उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. प्रा. मधू दंडवते यांच्या सूचनेवरून त्यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली. त्यावेळी माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग त्यांच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी अभिनेता गोविंदा त्यांच्या विरोधात निवडणूक लढवत होता. अर्थातच गोविंदाचा विजय झाला आणि विद्याताईंचा पराभव झाला. या निवडणुकीतून एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली, ती म्हणजे निवडणुकीत पक्ष फार महत्त्वाचा असतो. जनता दलात फूट पडल्यानंतर नवीन पक्ष काढण्यास प्रा. गोपाळ दुखंडे इच्छूक नव्हते. त्यामुळे विद्या चव्हाण यांनी आर. आर. पाटील, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत प्रवेश केला.
विद्याताई पहिल्यांदा 2007मध्ये नगरसेविका म्हणून विजयी झाल्या. त्या राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षाही बनल्या. 2010 मध्ये पक्षाच्या महिला अध्यक्षाही त्या बनल्या. त्यानंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.
समाजकारणात आल्यानंतर त्यांनी चैत्यभूमी बचाव आंदोलनही सुरू केलं होतं. वांद्रे वरळी सी लिंकसाठी समुद्रात भराव टाकला जात होता. त्यामुळे मँग्रोज नष्ट झाले होते. या भरावामुळे चैत्यभूमीला धक्का पोहोचण्याची शक्यताही निर्माण झाली होती. त्यामुळे चैत्यभूमी बचाव आंदोलन सुरू करण्यात आलं. त्यामुळे सरकार जागं झालं आणि त्यांनी चैत्यभूमीला धक्का बसू नये म्हणून समुद्रात ट्रेटापॅड टाकले. (Veteran social activist mrinal gore changed my life, says vidya chavan)
VIDEO: MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 15 August 2021https://t.co/7POFZnmfmb#MahafastNews100 #NewsBulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 15, 2021
संबंधित बातम्या:
प्रशांत ठाकूर; डॅशिंग, कार्यसम्राट आणि घराण्याचा वारसा असलेला राजकारणी!
(Veteran social activist mrinal gore changed my life, says vidya chavan)