Video : सदाभाऊ खोतांचा ताफा हॉटेल चालकानं अडवला, 2014 च्या जेवणाचे पैसे दिले नसल्याचा आरोप!; खोतांचं स्पष्टीकरण काय?

| Updated on: Jun 16, 2022 | 7:49 PM

आपले पैसे मिळावेत यासाठी हॉटेल चालकानं आज सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवला. त्यावेळी त्याने पैशाची मागणी केली. तेव्हा अनेक मोबाईल कॅमेरे त्या ठिकाणी सुरु होते. सदाभाऊ खोत यांनीही सबुरीनं घेत जे काय असेल तर मिटवू असा पवित्रा घेत हॉटेल चालकाला शांत करण्याचा प्रयत्न केला.

Video : सदाभाऊ खोतांचा ताफा हॉटेल चालकानं अडवला, 2014 च्या जेवणाचे पैसे दिले नसल्याचा आरोप!; खोतांचं स्पष्टीकरण काय?
सदाभाऊ खोत यांचा ताफा सांगोल्यात हॉटेल चालकाना अडवला
Image Credit source: TV9
Follow us on

सांगोला : माजी कृषी राज्यमंत्री आणि रयत क्रांती संघटनेते नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांचा ताफा सांगोल्यातील एका हॉटेल चालकानं अडवला. 2014 मध्ये सदाभाऊंचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये (Hotel) जेवले पण तेव्हापासून आजपर्यंत जेवणाचे पैसे दिले नाहीत, असा आरोप त्या हॉटेल चालकानं केलाय. आपले पैसे मिळावेत यासाठी हॉटेल चालकानं आज सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवला. त्यावेळी त्याने पैशाची मागणी केली. तेव्हा अनेक मोबाईल कॅमेरे त्या ठिकाणी सुरु होते. सदाभाऊ खोत यांनीही सबुरीनं घेत जे काय असेल तर मिटवू असा पवित्रा घेत हॉटेल चालकाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो हॉटेल चालक राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) कार्यकर्ता आहे आणि आपल्याला बदनाम करण्याचा तो प्रयत्न असल्याचा आरोप खोत यांनी केलाय.

सदाभाऊ खोतांचं स्पष्टीकरण काय?

दरम्यान, टीव्ही 9 शी बोलताना सदाभाऊ खोत यांनी तो हॉटेलचालक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा आरोप केलाय. मुळात त्या माणसाला मी ओळखत नाही. 2014 च्या निवडणुकीत तुमच्या हॉटेलमध्ये कोण लोक जेवायला आले होते, त्याची यादी द्या. किती लोक होते, हे तो दाखवत नाही. हा माणूस राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. ते काळे झेंडे आणि निदर्शनं करणार होते. पण माझा ताफा लवकर आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्यामुळे त्यांचं इतर नियोजन बारगळलं. 2014 पासून आतापर्यंत मी सांगोला तालुक्यात, परिसरात 50 वेळा आलो आहे. ज्या माणसाला मी ओळखत नाही, माझा मुलगा ओळखत नाही, ज्या माणसाकडे पुरावा काही नाही. राष्ट्रवादीला असं वाटतं की लढणाऱ्या माणसाला पहिल्यांदा बदनाम करायचा, समाजाच्या मनातून उतरायचा. पण आम्ही यांच्या बापाचं जेवण जेऊन आलेलो आहोत. आम्ही भविष्यात निश्चितपणे यांच्याशी दोन हात करु. या व्यक्तीविरोधात सांगोला पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केलाय. हा काय प्रकार आहे, 10 – 10 वर्षे तो का गप्प होता? हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे आणि याच्यामागे राष्ट्रवादीच्या नेत्याचा हात आहे, असा आरोप खोत यांनी केलाय.