कणकवली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य, त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना झालेली अटक आणि सुटका, या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. पुढे दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर नारायण राणे यांनी कालपासून पुन्हा एकदा आपल्या जन-आशीर्वाद यात्रेला सुरुवात केलीय. काल रत्नागिरी जिल्ह्यातून राणेंची ही यात्रा सिंधुदुर्गात दाखल झाली आहे. यावेळी ठिकठिकाणी राणे यांचं ढोलताशांच्या गजरात जंगी स्वागत केलं जात आहे. कणकवलीमध्येही राणे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. मात्र, त्यावेळी एक ठिकाणी नारायण राणेंना लाईटचा शॉक लागल्याचं पाहायला मिळालं. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. (Light shock to Union Minister Narayan Rane in Kankavali)
नारायण राणे कणकवलीमध्ये दाखल झाले. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला असलेल्या रेलिंगवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. महाराज्यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाल्यानंतर राणे तिथून निघाले. त्यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. राणेंनी चालताना रेलिंगचा आधार घेतला. त्यावेळी एक ठिकाणी राणेंना जोरदार करंट लागला. तेव्हा राणेंना आपला हात जोरात झटकला आणि बाजूला झाले. राणेंनी सोबत असलेले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि इतरांनाही त्या ठिकाणी करंट लागत असल्याचं सांगत सावध केलं आणि बाजूला होण्यास सांगितलं. त्यानंतर राणेंनी संबंधितांना सूचना देत तत्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. दरम्यान, व्हिडीओमध्ये राणेंना जोराचा करंट लागल्याचं पाहायला मिळत आहे. सुदैवानं कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
नारायण राणे सध्या त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच कोकणात आहेत. एक एक तालुका-गावात जाऊन ते जनतेचा आशीर्वाद घेत आहेत. आज यात्रेदरम्यान नारायण राणे यांना राजनाथ सिंहांचा तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन आला. माध्यमांचे कॅमेरे साहजिक राणेंवर खिळलेले होते. यावेळी माध्यमांच्या कॅमेरात राणे-राजनाथ सिंह यांचा संवाद कैद झाला.
राजनाथ सिंहांनी तब्येत बरी आहे का विचारल्यावर राणे म्हणाले, “सर मेरी तबियत अच्छी हैं… हॉस्पिटल में नहीं था… घर पर ही था…. तबियत बिगडी है ऐसी उन्होंने हवा कर दी”… यावर राजनाथ सिहांनी तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला तसंच उर्वरित यात्रेसाठी शुभेच्छा देखील दिल्या. सरतेशेवटी राणेंनी राजनाथ सिंह यांचे आभार मानले.
संबंधित बातम्या :
Narayan Rane : ते असताना संपवू शकले नाहीत, नसताना काय संपवणार? राणेंच्या यात्रेत पोस्टर
आम्ही सभ्यपणा पाळतोय, कुंडल्या आमच्याकडेही आहेत, संजय राऊतांचं राणेंना उत्तर
Light shock to Union Minister Narayan Rane in Kankavali