रात्री आणि सकाळी आमदारांनी हॉटेलमध्ये काय काय केलं?; ‘हॉटेल पॉलिटिक्स’ची इन्साईड स्टोरी काय?

| Updated on: Jul 11, 2024 | 1:11 PM

आता या आमदारांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये नेमकं काय काय केलं, याची माहिती समोर आली आहे.

रात्री आणि सकाळी आमदारांनी हॉटेलमध्ये काय काय केलं?; हॉटेल पॉलिटिक्सची इन्साईड स्टोरी काय?
Follow us on

Vidhan Parishad Election 2024 : आगामी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात उतरले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी सर्वच पक्षांनी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. विधानपरिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता या आमदारांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये नेमकं काय काय केलं, याची माहिती समोर आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने त्यांच्या सर्व आमदारांना आयटीसी ग्रँड सेंट्रल या हॉटेलमध्ये ठेवले आहे. ग्रँड आयटीसी या हॉटेलमध्ये आमदारांची बैठक सुरु होण्याआधी उद्धव ठाकरेंनी आमदार सुनील प्रभू यांना शुभेच्छा दिल्या. सुनील प्रभू यांचा 11 जुलैला वाढदिवस असतो. त्यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनीही त्यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. तसेच आमदार नितीन देशमुख यांनी परळच्या आयटीसी हॉटेलमध्ये सकाळी दाखल झाले. त्यांनी सकाळी हॉटेल बाहेरील परिसरात मॉर्निंग वॉकही केला.

यावेळी त्यांनी टीव्ही 9 मराठीशी भाष्य केले. विधानपरिषदेमधील पहिल्या पसंतीचे मत आम्ही मिलिंद नार्वेकर यांना देणार आहोत. आमचा विजय निश्चित होणार, असा विश्वास त्यांनी नितीन देशमुख यांनी व्यक्त केला.

एकाच मजल्यावर राहण्याची व्यवस्था

तसेच आगामी निवडणुकीत ठाकरे गटाकडून आमदारांची विशेष काळजी घेतली जात आहे. ठाकरे गटाने त्यांच्या सर्व आमदारांना आयटीसी ग्रँड सेंट्रलमध्ये ठेवले आहे. या सर्व आमदारांना यावेळी सर्व आमदारांना खेळीमेळीच्या वातावरणात ठेवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जात आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेही आमदारांसोबत राहणार आहेत. तसेच या सर्व आमदारांच्या राहण्याची व्यवस्था एकाच मजल्यावर करण्यात आली आहे.

दरम्यान सध्या आयटीसी ग्रँड सेंट्रल या हॉटेलमध्ये अजय चौधरी, वैभव नाईक, उदयसिंग राजपूत, राजन साळवी, प्रकाश फातर्फेकर, राहुल पाटील, सुनील प्रभू, सुनील राऊत, संजय पोतनीस, आदित्य ठाकरे, रमेश कोरगावकर, नितीन देशमुख हे आमदार उपस्थित आहेत. तर कैलास पाटील,, शंकरराव गडाख आणि भास्कर जाधव हे उर्वरित आमदार आज येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.