मुंबई : राज्यात सध्या राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) निवडणुकीबरोबरच विधान परिषेदेच्या निवडणुकीनेही (Vidhan Parishad Election) जोर धरला आहे. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यात सध्या भाजपकडून 7 जणांची नावं चर्चेत आहेत. त्यात पंकजा मुंडे (Pankaja Munde), हर्षवर्षन पाटील, माजी मंत्री राम शिंदे अशा मोठ्या नवांची चर्चा आहे. तसेच इतरही काहीजण रेसमध्ये आहेत. आता यात भाजपकडून कुणाची लॉटरी लागणार आणि कुणाची निराशा होणार हे चित्र लवकरच स्पष्ट होणार असं दिसतंय. गेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडे यांच्याविरोधात पराभव पत्करावा लागला होता. मात्र आता त्याचं नाव आघाडीवर आहे. तसेच हे सर्व वरीष्ठ पातळीवर ठरेल, मात्र पंकजा मुंडे यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असे विधान काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच या तीन बड्याा नेत्यांसोबत इतरही काही मोठी नावं चर्चेत आहेत.
भाजपकडील सध्याच्या आकडेवारीचा विचार केल्यास भाजपकडून चार जणांना आरामात विधान परिषदेवर संधी मिळू शकते. मात्र पाच जणांना विधान परिषदेवर पाठवण्याचा भाजपचा प्रयत्न हा नक्की राहणार आहे. त्यामुळे हे पाच जण कोण असणार? हेही चित्र लवकच स्पष्ट होईल.
आता ज्यांचा कार्यकाळ संपत आहे, अशा सदस्यांमध्येही अनेक मोठी नावं आहे. यात भाजपकडून विरोधकांशी सतत लढणारा चेहरा म्हणून सदाभाऊ खोत सतत मैदानात असतात. त्यांचा कार्यकाळ संपला आहे. तसेच इतर पक्षातीलही काही मोठी नावं आहेत. जसे की राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.