मुंबई : आज महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे. आज शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Passed Away) यांचं निधन झालं आणि मराठा समाजाच्या न्याय-हक्कासाठी लढणारा माणूस महाराष्ट्रानं गमावला. ही राज्यासाठी मोठी पोकळी असल्याची प्रतिक्रिया दिग्गजांनी विनायक मेटेंच्या निधनावर (Vinayak Mete Passed Away) व्यक्त केली आहे. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंच्या गाडीला अपघात झाला. पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. ही घटना खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ घडली. मराठा समन्वय समितीची आज दुपारी बैठक होती त्यासाठी ते मुंबईच्या दिशेनं येत असल्याची होते. दरम्यान, अपघात ते गंभीररित्या जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. विनायक मेटेंच्या निधनावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (MP Sambhajiraje Chatrapati) यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. ते काय म्हणालेत वाचा..
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या निधनावर आपली भावना व्यक्त केली आहे. ते म्हणालेत. ‘एक मोठा शॉक आहे. मराठा समाजासाठी परखडपणे आपली बाजू ते मांडत आले. मराठा समाजाला न्याय मिळावा, यासाठी त्यांनी विधानभवनात आपली बाजू मांडली. मराठा समाजावरील अन्याय सरकारनं दूर करावा, याने शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी उभारलेल्या लढ्याला यश मिळेल. आजची बातमी ऐकूण मोठा शॉक बसला. वेळोवेळी त्यांनी मला अनेकदा फोन केले होते. कशा पद्धतीनं आपण एकत्र येऊ शकतो, यावर देखील अनेकदा संवाद साधला. छत्रपती घराण्याविषयी त्यांना नेहमी आदर होता, अशी भावना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या निधनावर आपली भावना व्यक्त केली आहे.
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या निधनावर राज्यातील दिग्गज नेत्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही विनायक मेटेंच्या निधनावर दुख व्यक्त केलंय. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या निधनाची बातमी कळताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते प्रवीण दरेकर पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात दाखल झाले आहेत. आज मराठा समन्वय समितीची बैठक असल्यानं पहाटेच विनायक मेटे हे मुंबईकडे येत असताना अचानकच एका ट्रकचा आणि मेटेंच्या गाडीचा अपघात झाला. यानं मराठा समाजाचा मोठा नेता गमावल्याची भावना अनेक दिग्गज नेत्यांनी व्यक्त केली आहे.