मुंबई : ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एआयएमआयएमचे (AIMIM) माजी आमदार आणि नेते वारीस पठाण (Waris Pathan) यांना काळं फासल्याचा दावा करत एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. वारीस पठाण हे सध्या मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) इंदुरच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी एका तरुणानं वारीस पठाण यांना काळं फासल्याचं बोललं जात आहे. मात्र, याबाबत वारीस पठाण यांनाच विचारलं असता अशी कुठलीही घटना घडली नसल्याचं त्यांनी सांगितलं. आपण एका दर्ग्यात गेलो होतो. तिथे चादर पेश केली. तिथे काही तरुणांनी आपलं हार घालून स्वागत गेलं. तसंच एका तरुणानं नजर लागू नये म्हणून लहान मुलांना लावतात ते काजळ लावलं होतं. पण सगळ्या इंदुरमध्ये असं काजळ लावून कसं फिरणार म्हणून मी एका ठिकाणी बसून ते धुतलं. मात्र, काँग्रेसवाल्यांनी तेव्हा फोटो काढून काळं फासल्याची अफवा उठवल्याचा दावा पठाण यांनी केलाय. तसंच काँग्रेस घाबरली आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय.
दरम्यान, वारीस पठाण यांनी आपल्याला काळं फासल्याचा दावा फेटाळून लावला असला तरी व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण त्यांना काळ फासून पळाल्याचं पाहायला मिळत आहे. वारीस पठाण जेव्हा दर्गाहवर चादर चढवून बाहेर येतात. त्यावेळी काही लोक तिथे उभे असतात. त्यातील एकजण त्यांना हार घालतो आणि काळं फासून पळतो. तेव्हा तिथे असलेले अन्य काही जण त्या तरुणाला पकडा असा आवाज करताना दिसत आहेत, व्हिडीओमध्ये तो गोंधळ ऐकायलाही मिळत आहे. त्यामुळे वारीस पठाण यांनी आपल्याला काळं फासलं गेलं नाही तर काजळ लावल्याचा दावा किती खरा आहे, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
Ink thrown on AIMIM leader Waris Pathan, brother of owaisi in Indore.
Accused Saddam was not happy with divisive politics of Waris Pathan
Videopic.twitter.com/nTLQPQABeC— CNJaipur1 (@CJaipur1) February 1, 2022
वारीस पठाण हे इंदुरच्या खरराना दर्गाह इथे गेले होते. त्यावेळी ते दर्गाहवर चादर चढवण्यासाठी गेले. तिथून बाहेर पडताना एका तरुणाने वारीस पठाण यांना काळ फासलं आणि त्याने तिथून पळ काढला. मात्र, पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. हिंदी वृत्त वाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खजराना ठाण्याचे प्रभारी दिनेश कुमार वर्मा यांनी सांगितलं की अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव सद्दाम पटेल असं आहे. तो 320 वर्षाचा आहे. तो पेशाने मजदूर आहे. प्राथमिक चौकशीदरम्यान या तरुणाने सांगितलं की मला वारीस पठाण ही व्यक्ती आवडत नाही. कारण ती सातत्याने देशविरोधी वक्तव्ये करत असतात आणि मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचं काम करतात.
इतर बातम्या :