पार्थची जागा जिंकून येणारी नव्हती : शरद पवार

| Updated on: May 24, 2019 | 5:48 PM

मुंबई : पार्थची जागा आम्ही कधीच जिंकलो नव्हतो, जिंकून येणारी ती जागा नव्हती पण आम्ही प्रयत्न केला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. निवडणूक निकालानंतर गुरुवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषेदत शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. मावळ लोकसभा मतदारसंघात शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा पराभव झाला. शिवसेनेचे […]

पार्थची जागा जिंकून येणारी नव्हती : शरद पवार
Follow us on

मुंबई : पार्थची जागा आम्ही कधीच जिंकलो नव्हतो, जिंकून येणारी ती जागा नव्हती पण आम्ही प्रयत्न केला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. निवडणूक निकालानंतर गुरुवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषेदत शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. मावळ लोकसभा मतदारसंघात शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा पराभव झाला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी इथे जवळपास 2 लाख मतांनी विजय मिळवला.

याबाबत शरद पवार म्हणाले, “पार्थची जागा आम्हाला न येणारी होती. न येणाऱ्या जागेवर आपण एखादा नवा उमेदवार देऊन प्रयत्न करुन बघावा हा त्यामागचा हेतू होता. यापूर्वी आम्ही ती जागा जिंकलेली नव्हती. मागच्या निवडणुकीत जिंकली नव्हती, त्याच्या आधीच्या निवडणुकीत जिंकली नव्हती. आमच्या कार्यकर्त्यांनी इथे निश्चित चांगलेच प्रयत्न केले. इथे आमचा वेग वाढवण्याच्या दृष्टीने जी कामगिरी करायची होती ती करु शकलो.”

बारामती, शिरुर, सातारा रायगडमध्ये आम्ही विजयी झालो. बुलडाणा आणि परभणीच्या जागांचा निकाल चांगला अपेक्षित आहे, असं पवार म्हणाले होते. मात्र या दोन्ही जागी राष्ट्रवादीचा पराभव झाला.

आमची अपेक्षा जास्त होती, पण लोकांनी जे मतदान केलं, त्याबद्दल लोकांच्या प्रतिसादाला आभार मानतो. आम्ही फार मोठ्या फरकाने जागा गमावल्या आहेत असं वाटत नाही.

मागच्या वेळी भाजपला यश मिळालं त्याचं मार्जिन लाखात होतं, आता ते कमी झालं आहे.आम्ही लोकांचा कौल स्वीकार करतो, असं शरद पवार म्हणाले.

ईव्हीएमबद्दल यावेळी संशयाचं भूत निर्माण झालं होतं, असं त्यांनी सांगितलं.  वंचित विकास आघाडीनं जरी ३०-४० हजार मतदान घेतलं. विधानसभानिहाय मतदान कमी पडलंय, पण तरीही त्याचा विचार करावा लागेल. अशा पद्धतीनं मतदान लोक करत असतील तर त्याचा विचार व्हावा, असं पवार म्हणाले.

राज ठाकरे यांनी सभा घेतल्या पण त्यांचा उमेदवार नव्हता. त्यामुळं त्यांची मतं कुठे पाडायची हे कळून आलं नाही. आमची अपेक्षा 11-12 जागांची होती, आमची चूक झाली असं म्हणणार नाही पण बारामती जिंकण्याची भाषा करणाऱ्यांना मतदारांनी त्यांची जागा दाखवली, असं शरद पवारांनी नमूद केलं.

अनेक पद्धतीनं बारामती ताब्यात घ्यायचे प्रयत्न झाले. पण लोकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. विधानसभा आणि लोकसभा वेगवेगळा विषय आहे. लोकसभेला मोदींकडे बघून लोकांनी मतदान केलं, पण विधानसभेला तसंच होईल असं वाटत नाही, असंही शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांची पत्रकार परिषद