Bjp leader : ‘या देशात राष्ट्रवादी मुस्लिम हा….’, मुस्लिमांसंदर्भात भाजपा नेत्याच वादग्रस्त वक्तव्य

| Updated on: Jul 18, 2024 | 9:51 AM

'मी 'सबका साथ, सबका विकास' बोलणार नाही. या देशात राष्ट्रवादी मुस्लिम प्रकारच नाहीय. हे सर्व बकवास आहे' असं हा नेता म्हणाला. त्यांच्या वक्तव्यावरुन वाद सुरु झाल्यानंतर या नेत्याने स्पष्टीकरण दिलं. 'भाजपा जर 'सबका साथ, सबका विकास' घोषणेसोबत आहे, तर त्यांनी या नेत्यावर कारवाई करावी' अशी विरोधी पक्षाची मागणी आहे.

Bjp leader : या देशात राष्ट्रवादी मुस्लिम हा...., मुस्लिमांसंदर्भात भाजपा नेत्याच वादग्रस्त वक्तव्य
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुस्लिमांसंदर्भात भारतीय जनता पार्टीचे नेते शुभेंदु अधिकारी यांनी एक वक्तव्य केलय. त्यामुळे कोलकातापासून दिल्लीपर्यंत राजकारणाचा पारा वाढला आहे. शुभेंदु म्हणाले की, “आपल्याला रणनितीमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. सबका साथ, सबका विकास ऐवजी जो मत देणार, त्याचच काम करणार असं बोललं पाहिजे” शुभेंदु अधिकारी यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने आपण त्या मताशी सहमत नसल्याच स्पष्ट केलं. 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ, सबका विकास’चा नारा दिला होता. केंद्रातल्या मोदी सरकारला याच घोषणेमुळे विस्तार करता आला.

शुभेंदु अधिकारी बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत.कोलकाता येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. “आपल्याला भाजपातंर्गत अल्पसंख्यक मोर्चा बंद केला पाहिजे. जे लोक भाजपाला मत देत नाहीत, त्यांच्यासाठी काम का करायचं? भाजपाचा अर्थ हिंदुंचा पक्ष आहे” असं शुभेंदु अधिकारी म्हणाले.

‘या देशात राष्ट्रवादी मुस्लिम प्रकारच नाहीय’

‘मी ‘सबका साथ, सबका विकास’ बोलणार नाही. या देशात राष्ट्रवादी मुस्लिम प्रकारच नाहीय. हे सर्व बकवास आहे’ असं शुभेंदु अधिकारी म्हणाले. त्यांच्या वक्तव्यावरुन वाद सुरु झाल्यानंतर शुभेंदु अधिकारी यांनी स्पष्टीकरण दिलं. शुभेंदु नंतर म्हणाले की, ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ सोबत आहे’

‘नरेंद्र मोदी यांचा हा अपमान असल्याच म्हटलय’

तृणमुल काँग्रेसने शुभेंदु अधिकारी यांचं हे वक्तव्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान असल्याच म्हटलं आहे. तृणमूलचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले की, ‘भाजपा जर ‘सबका साथ, सबका विकास’ घोषणेसोबत आहे, तर त्यांनी शुभेंदुवर कारवाई करावी’

भाजपाच्या लोकसभेच्या 6 जागा कमी झाल्या

2021 विधानसभा आणि आता 2024 लोकसभा निवडणुकीत शुभेंदु अधिकारी यांच्या नेतृत्वात भाजपाच पराभव झालाय. 2024 मध्ये भाजपाच्या लोकसभेच्या 6 जागा कमी झाल्या. शुभेंदु अधिकारी यांचा बालेकिल्ला असलेल्या कांथी आणि तमलुकमध्ये भाजपाला विजय मिळाला. आरामबाग, घाटल, मेदिनीपुर आण झाडग्राममध्ये भाजपाचा दारुण पराभव झाला.

शुभेंदु यांना याचा फटका बसला. त्यांच्या घरात आता फक्त एक खासदार उरला आहे. आधी शुभेंदु यांच्या कुटुंबातून कमीत कमी 2 खासदार निवडून जायचे. सीएसडीएसनुसार लोकसभा निवडणुकीत भाजपाला मुस्लिमांची फक्त 7 टक्के मत मिळाली. त्यातुलनेत तृणमूलला भरभरुन मतदान झालं. 2024 मध्ये तृणमुलला 73 टक्के मत मिळाली. पश्चिम बंगालमध्ये 28 टक्के मुस्लिम आहेत.