Bihar Politics | बिहार विधानसभेत आज नितीश कुमार सरकारची अग्नि परीक्षा होणार आहे. मागच्या महिन्यात नितीश कुमार राष्ट्रीय जनता दलाची साथ सोडून भाजपाप्रणीत NDA मध्ये सहभागी झाले. त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारमध्ये एनडीएच सरकार सहज तरुन जाईल असं वाटल होतं. कारण बहुमतासाठी जो आकडा लागतो, त्यापेक्षा जास्त आमदार एनडीए आघाडीकडे आहेत. पण आता खेळ बदलाना दिसतोय. आज बिहार विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर मतदान होईल. या बहुमत चाचणीआधी पडद्यामागे बरच काही घडतय. बिहारमध्ये खेला होऊ शकतो. NDA चा भाग असलेले HAM चे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचा फोन लागत नाहीय. रात्री उशिरापर्यंत एनडीएच्या आठ आमदारांशी संपर्क होत नव्हता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेडीयूचे 5 आणि भाजपाचे 3 आमदार संपर्कात नव्हते. आधी ही संख्या 6 होती, नंतर 8 झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, 8 आमदार नसल्याने नितीश कुमार मोठा निर्णय घेऊ शकतात. जीतनराम मांझी यांचा फोन रात्री 10 च्या सुमारास स्विच ऑफ झालाय. बहुमत चाचणीआधी खेला होईल, असा आरजेडीचा दावा आहे. नितीश सरकार कोसळणार असा काँग्रेसचा दावा आहे. माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी दोनवेळा बिहार पोलीस पोहोचले, त्यामुळे आरजेडीमध्ये सुद्धा अस्वस्थतता आहे.
बिहारमध्ये कोणाकडे किती आमदार?
दरम्यान राष्ट्रीय जनता दलाचे नेते मृत्यूंजय तिवारी यांनी मोठ विधान केलं आहे. नितीश सरकार फक्त काही तासांचे पाहुणे आहेत, असं त्यांनी म्हटलय. बिहारच्या राजकारणात बरच मोठ काहीतरी घडण्याचे संकेत मिळत आहेत. बिहार विधानसभेत बहुमताचा जादुई आकडा 122 आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली NDA आघाडी आपल्याकडे 128 आमदार असल्याचा दावा करत आहे. यात भाजपाचे 78, जेडीयूचे 45, हमचे 4 आणि एक अपक्ष आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीकडे 115 आमदार आहेत. यात बहुमतासाठी 7 जाग कमी पडतायत. फ्लोर टेस्टआधी जेडीयू आमदारांची बैठक पाटण्याच्या चाणक्य हॉटेलमध्ये सुरु आहे. प्रदेश अध्यक्ष उमेश कुशवाहा आणि अन्य वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. नितीश सरकार फ्लोर टेस्टआधी रणनिती आखत आहे.