कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बस्वराज बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. केंद्रीय निरिक्षक धर्मेंद्र प्रधान
यांनी बंगळुरुत ही घोषणा केली. बस्वराज बोम्मई हे लिंगायत ह्या कर्नाटकातल्या बहुल समाजातूनच येतात. ते सध्याचे
काळजीवाहू मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय समजले जातात. खुद्द येडियुरप्पांनीच त्यांचं नाव पक्षश्रेष्ठींना
सुचवलं आणि त्यावर कर्नाटकात शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं समजतंय.
बस्वराज बोम्मई हे आधी जलसंपदा मंत्री आणि नंतर कर्नाटकच्या गृहमंत्रीपदी राहीले. आता त्यानंतर ते थेट मुख्यमंत्री
म्हणून शपथ घेतील. विशेष म्हणजे बस्वराज बोम्मई हे कर्नाटकचेच माजी मुख्यमंत्री एस.आर.बोम्मई यांचे पूत्र आहेत.
म्हणजेच आधी वडील आणि नंतर मुलगाही मुख्यमंत्री होण्याची कर्नाटकातली ही दुसरी वेळ आहे. त्यांच्या आधी
एच.डी.देवेगौडा आणि एच.डी. कुमारस्वामी हे दोघे वडील-मुलगा मुख्यमंत्रीपदी राहीले.
It is a big responsibility in the given situation. I will strive to work for the welfare of the poor. It will be pro-people and pro-poor people governance: Karnataka CM elect Basavaraj S Bommai pic.twitter.com/FPSXRbB8ID
— ANI (@ANI) July 27, 2021
कोण आहेत बस्वराज बोम्मई?
बस्वराज बोम्मई हे भाजपात वेगानं वर गेलेल्या नेत्यांपैकी एक मानले जातात. म्हणजेच बोम्मईंनी राजकीय करिअरची
सुरुवात ही जनता दलातून केली. त्यानंतर ते 2008 साली भाजपात आले. नंतर विधान परिषदेवर दोन वेळेस आमदार
झाले. हावेरी जिल्ह्यातल्या शिगगाव विधानसभेचं ते सध्या प्रतिनिधीत्व करतात. आधी येडियुरप्पा सरकारमध्ये त्यांनी
जलसंपदा खात्याचा कारभार सांभाळला तर नंतर ते थेट गृहमंत्रीपदी विराजमान झाले. त्यातून आता ते
मुख्यमंत्री असतील. इतर पक्षातून भाजपात आलेला नेता, तेही दहा ते बारा वर्षात थेट मुख्यमंत्रीपदी विराजमान
होण्याची ही दुसरी वेळ आहे. आसामचे सध्याचे मुख्यमंत्री हे काँग्रेसमधून भाजपात आलेले आहेत. त्यानंतर आता
कर्नाटकातही तसच घडताना दिसतंय
We will take all measures to fight COVID19 and floods in the state: Karnataka CM elect Basavaraj Bommai, in Bengaluru pic.twitter.com/Bn7rugiH9y
— ANI (@ANI) July 27, 2021
भाजपचं नेतृत्वबदलाचं नवं धोरण
गेल्या काही काळात भाजपानं अनेक राज्यात नेतृत्वबदल केलेला दिसतोय. त्यात उत्तराखंडमध्ये तिरथसिंह रावत
यांना बदलून धामींना मुख्यमंत्री केलं. आसाममध्ये सर्बानंद सोनोवाल यांना बदलून काँग्रेसमधून आलेले हेमंत बिस्व सरमा
यांना मुख्यमंत्रीपद मिळालं. बिहारमध्ये सुशीलकुमार मोदींना पुन्हा भाजपनं संधी दिली नाही. उत्तर प्रदेशातही
नेतृत्वबदलाच्या चर्चा रंगल्या पण योगींसमोर दिल्ली हायकमांडचं फारसं काही चाललं नाही.
(Who is basavraj bommai appointed as the next chief minister of karnataka)