उदय सामंत यांच्या पत्रात अनेक मुद्दे नमुद करण्यात आले आहेत. या पत्राची राजकीय वर्तुळात चर्चा देखील रंगली आहे. दरम्यान, शिंदे-ठाकरेंचं जुळू नये म्हणून कोण कट रचतंय? हा निशाणा देखील पत्रातून सोडण्यात आलाय.
Ad
उदय सामंत, आमदार
Image Credit source: social
Follow us on
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील गटाने शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. शिंदे गटाच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आणि शिवसेना पक्षप्रमुखांवर मुख्यमंत्रीपद सोडण्याची वेळ आली. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक साद पत्राच्या माध्यमातून घातली होती. यावेळी त्यांनी पत्रात निष्ठेसंदर्भातही भाष्य केलं. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पत्रानंतर आता बंडखोर आमदार उदय सामंत (Uday Samant) यांनी शिवसैनिकांना पत्र लिहिलंय. विशेष म्हणजे या पत्रात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आणि वाघाचा फोटो आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या फोटोला उदय सामंत यांच्या पत्रात कुठेही स्थान नसल्याचं दिसतंय. उदय सामंत यांच्या पत्रात अनेक मुद्दे नमुद करण्यात आले आहेत. या पत्राची राजकीय वर्तुळात चर्चा देखील रंगली आहे. दरम्यान, शिंदे-ठाकरेंचं जुळू नये म्हणून कोण कट रचतंय? हा निशाणा देखील पत्रातून सोडण्यात आलाय.
उदय सामंत यांचं पत्र
उदय सामंत यांच्या पत्रातील प्रमुख मुद्दे
एकनाथ शिंदे गटात सामील झालेल्या उदय सामंत यांनी शिवसैनिकांना लिहलेल्या पत्रात अनेक मुद्दे आहेत
पत्रात फक्त बाळासाहेब ठाकरे यांचा आणि वाघाचा फोटो आहे. उद्धव ठाकरे यांचा फोटो गायब