युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज हे संबंध महाराष्ट्राचेच नाही तर राष्ट्राचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी गुलामगिरीच्या साखळ्या खंडित करत सर्वसामान्य जनतेचे स्वराज्य निर्माण केले. चोहोबाजूंनी शत्रूंनी घेरलेले असताना स्वराज्य निर्मिती केली. या राष्ट्रात अस्मिता, स्वाभिमानाचे स्फुलिंग चेतवले. या स्वराज्याला नैतिकतेचे अधिष्ठान होते. मागील कित्येक हजार वर्षात जगाच्या इतिहासात असा युगपुरूष घडला नाही. त्यांच्या प्रेरणेनेच पुढे मराठ्यांनी देशभरात मोठा पराक्रम गाजवला. मुर्दुमकी गाजवली. पण आता महाराजांच्या इतिहासासंबंधी अकारण वादाचे उद्योग करण्यात येतात. पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरुन आता महाराजांची समाधी कोणी शोधली यावरून पुन्हा चर्चा होत आहे. ही समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधली की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी शोधली यावरुन वादाचा प्रयत्न करण्यात येत आहे. काय आहे हा वाद? काय सांगतो इतिहास? मोहन भागवत यांचं वक्तव्य काय? पुण्यात तंजावरचे मराठे या पुस्तकाचं मोहन भागवत यांनी प्रकाश केले. त्या कार्यक्रमात त्यांच्या एका विधानाने राज्यात गहजब उडाला. शिवाजी महाराजांचं राज्य किती होतं? आज सरकारी महाराष्ट्र...