पश्चिम बंगालमध्ये ज्या 9 जागांवरील मतदानाआधी हिंसाचार झाला, तिथे कोण जिंकलं?

| Updated on: May 23, 2019 | 8:02 PM

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत. त्यापैकी 9 जागांवर निवडणुकीच्या शेवटच्या म्हणजेच सातव्या टप्प्यात 19 मे रोजी मतदान झालं. या 9 जागांवर मतदान होण्याआधी इथे 14 तारखेला अमित शाह यांचा भाजप उमेदवारांच्या प्रचारासठी रोड शो होता. या रोड शोदरम्यान भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर हिंसाचारात झाले. विद्यासागर कॉलेज […]

पश्चिम बंगालमध्ये ज्या 9 जागांवरील मतदानाआधी हिंसाचार झाला, तिथे कोण जिंकलं?
Follow us on

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत. त्यापैकी 9 जागांवर निवडणुकीच्या शेवटच्या म्हणजेच सातव्या टप्प्यात 19 मे रोजी मतदान झालं. या 9 जागांवर मतदान होण्याआधी इथे 14 तारखेला अमित शाह यांचा भाजप उमेदवारांच्या प्रचारासठी रोड शो होता. या रोड शोदरम्यान भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर हिंसाचारात झाले.

विद्यासागर कॉलेज रोडवर भाजपाध्यक्ष अमित शाह यांचा रोड शो होता. तिथेच हिंसाचार झाला. या दरम्यान विद्यासागर कॉलेजमध्ये बसवण्यात आलेल्या थोर समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याचीही नासधूस समाजकंटकांनी केली. या हिंसाचारामुळे पश्चिम बंगालमधील शेवटच्या टप्प्यासाठीचा प्रचारही दोन दिवस आधीच थांबवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले.

त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भारतीय जनता पक्षात मोठा वाद झाला. दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले.

19 मे रोजी मतदान पार पडलं आणि त्याच संध्याकाळी देशभरातील जागांसाठीचे एक्झिट पोलही आले. ‘टीव्ही 9-सी व्होटर’च्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमधील 42 जागांपैकी 29 जागांवर तृणमूल काँग्रेस, 11 जागांवर भाजप आणि 2 जागांवर काँग्रेस विजयी होण्याचा अंदाज होता. म्हणजेच, 2014 साली 2 जागांवर असलेली भाजप थेट 11 जागांवर उडी घेईल असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला होता. मात्र, आता अधिकृत निकालही समोर आले आहेत.

आज देशभरातील लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. त्यानंतर सहाजिक अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती की, ज्या 9 जागांसाठी पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाला, त्या 9 जागांवर कुठल्या पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. अखेर निवडणूक आयोगाने विजयी उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. ती यादी खालीलप्रमाणे :

  • डमडम – सौगाता रॉय (तृणमूल काँग्रेस)
  • बरासत – डॉ. काकोली घोषदास्तीदार (तृणमूल काँग्रेस)
  • बसिऱ्हाट – नुसरत जहाँ रुही (तृणमूल काँग्रेस)
  • डायमंड हार्बर- अभिषेक बॅनर्जी (तृणमूल काँग्रेस)
  • दक्षिण कोलकाता – माला रॉय (तृणमूल काँग्रेस)
  • उत्तर कोलकाता – बंदोपाध्याय सुदीप (तृणमूल काँग्रेस)
  • जादवपूर – मीमी चक्रवर्ती (तृणमूल काँग्रेस)
  • जॉयनगर – प्रतिमा मंडल (तृणमूल काँग्रेस)
  • मथुरापूर – चौधरी मोहन जाटुआ (तृणमूल काँग्रेस)

एंकदरीत, ज्या जागांवरील मतदानाआधी कोलकात्यातील भाजपाध्यक्ष अमित शाहांच्या रोड शोमध्ये हिंसाचार झाला, त्या सर्वच्या सर्व जागा तृणमूल काँग्रेस जिंकली आहे. त्यामुळे हिंसाचाराचा कोणताही फायदा भाजपला झालेला दिसत नाही.