मुंबई : पुन्हा एकदा शिवसेनेचा महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे. एकनाथ शिंदे(Ekanath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ठाकरे याच्याशी बंडखोरी करत एकनाथ 40 पेक्षा अधिकांना आपल्या सोबत घेऊन महाराष्ट्राबाहेर केले. ही बाळासाहेबांची शिवसेना असल्याचे म्हणत शिंदे गटाने शिवसेनेवर दावा केला. तर उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) ही फक्त बाळासाहेबांची आहे असं म्हणत या बंडखोरांना एक प्रकारचा इशारा दिल होता. यामुळे खरी शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची? अशी चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत उदाहरणासह याचा निकाल लावला.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याला नवं सरकार मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्यात. त्यावेळी पत्रकारांनी महाविकास आघाडी सरकार टिकवण्यात उद्धव ठाकरे, तुम्ही कमी पडलात का? असा प्रश्न विचारला. त्यावेळी पवार म्हणाले की, ‘आम्ही कमी पडलो नाही. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या लोकांना बाहेर न्यायला प्रभावी ठरले. त्याचा मूळ इफेक्ट. 38 आमदार बाहेर जातात, ही काही साधी गोष्ट नाही. ती नेण्यासाठी कुवत शिंदेंनी दाखवली. त्यातच त्यांचं यश आहे’.
शिवसेना संपुष्टात येईल असे वाटत नाही. चढ-उतार होतात. भुजबळ आमच्याकडे आले, ते सगळे पराभूत झाले. भुजबळांचाही पराभव झाला. राणेही बाहेर पडले, त्यांचाही पराभव झाला. या नेत्यांची उदाहरणे देत संघटना अशी संपत नसते असं पवार म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना हायजॅक केलीय का? असा प्रश्नही पवारांना विचारला. त्यावर उद्धव ठाकरेंच्या पक्षातील सहकाऱ्यांचं मत असेल तर माहीत नाही. ते लोकांवर विश्वास टाकतात आणि पूर्ण जबाबदारी देतात हा त्यांचा स्वभाव आहे. उद्धव ठाकरेंनी संघटनेची जबाबदारी आणि विधीमंडळाची संपूर्ण जबाबदारी शिंदेकडे दिली होती. त्याचा हा कदाचित परिणाम आहे की नाही मला माहीत नाही, असंही पवार म्हणाले.
आज एकनाथ शिंदे यांच्यावर जी जबाबदारी पडली. माझं त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं, त्यांना शुभेच्छा दिल्या. अपेक्षा अशी आहे की एकदा राज्याचा प्रमुख झाल्यावर तो राज्याचा होतो. तो कोणत्या पक्षाचा प्रतिनिधी असेल. पण शपथ घेतल्यावर तो राज्याचा प्रतिनिधी होतो, राज्याचा प्रमुख होतो. राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडून कामगिरी व्हावी ही अपेक्षा आहे आणि ती मी त्यांना बोलून दाखवली. त्यासाठी त्यांना अंत:करणापासून शुभेच्छा दिल्या, अशी माहितीही पवार यांनी दिलीय.