अहमदाबाद: पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर, गुजरात आणि पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे भाजपने अनेक राज्यांमध्ये थेट मुख्यमंत्री बदलण्यासच सुरुवात केली आहे. उत्तराखंड, कर्नाटकनंतर आता गुजरातमध्येही मुख्यमंत्री बदलण्यात आले आहेत. नव्या चेहऱ्यांना संधी देऊन पक्ष अधिकाधिक बळकट करण्याचं भाजपमध्ये घटत असल्यानेच भाजपने मुख्यमंत्री बदलाचा सपाटा लावला असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (why bjp change cm in his ruling states, read inside story)
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपण पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे त्यांनी संधी दिल्याबद्दल आभार मानले. रुपाणी यांनी आजारपणाच्या कारणामुळे राजीनामा दिल्याचं सांगितलं जातं. मात्र, त्याबाबत कुणीही दुजोरा दिला नाही. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण समजू शकलं नाही. गुजरातमधील पटेल समाज भाजपवर नाराज आहे. त्यामुळे पटेल समाजाची नाराजी दूर करण्यासाठी भाजपने व्यूवहरचना आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रुपाणी यांचा राजीनामा घेण्यात आला असून त्यांच्या जागी पटेल समाजातून मुख्यमंत्री देण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे.
या आधी 2 जुलै रोजी तीरथ सिंह रावत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना रावत यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्रं लिहिलं होतं. त्यात त्यांनी राजीनाम्याचं कारण सांगितलं होतं. मुख्यमंत्र्यांना 6 महिन्याच्या आत विधानसभा सदस्य होणं अपेक्षित आहे. मात्र, कलम 151 प्रमाणे राज्यातील विधानसभा निवडणुका होण्यास केवळ 1 वर्षाचा कालावधी शिल्लक असेल तर पोटनिवडणूक घेता येत नाही. त्यामुळे राज्यात संवैधानिक संकट तयार होऊ नये म्हणून मी राजीनामा देऊ इच्छित आहे, असं रावत यांनी म्हटलं होतं.
बीएस येडियुरप्पा यांनी 26 जुलै रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यानंतर त्यांनी त्यांच्या भावनाही व्यक्त केल्या होत्या. कर्नाटकातील जनतेच्या मी ऋणात आहे. मी अधिकारी आणि आमदारांना सांगू इच्छितो, की जनतेने आपल्या सर्वांचा विश्वास गमावला आहे. आपण अधिक कठोर आणि स्वच्छ- प्रामाणिक मार्गाने कार्य केले पाहिजे. बरेच अधिकारी प्रामाणिक आहेत, मात्र सर्वांनीच ते झाले पाहिजे. बंगळुरु हा जागतिक दर्जाच्या शहरात विकसित होत आहे, अशा भावना येडियुरप्पा यांनी व्यक्त केल्या होत्या.
भाजपने आतापर्यंत कर्नाटक, उत्तराखंड आणि गुजरातमधील मुख्यमंत्री बदलले आहेत. कर्नाटक वगळता इतर दोन राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यातही उत्तराखंडची परिस्थिती वेगळी होती. उत्तराखंडमध्ये तीरथ सिंह रावत हे मुख्यमंत्री होते. ते निवडून आलेले नव्हते. त्यामुळे त्यांना सहा महिन्याच्या आत निवडून होणं अपेक्षित होतं. उत्तराखंडमध्ये विधान परिषद नसल्याने त्यांना विधान परिषदेतून निवडून आणणं शक्य नव्हतं. दुसरीकडे भाजपमधील एकही आमदार राजीनाम देऊन त्यांच्यासाठी जागा रिक्त करायला तयार नव्हता. त्यामुळे रावत यांची कोंडी झाली होती. परिणामी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
कर्नाटकमध्ये येडियुरप्पांवर पक्षश्रेष्ठी नाराज होते. त्यांच्यावर अनेक आरोपही झाले होते. त्यामुळे राज्यातील पक्षाची प्रतिमा मलिन झाली होती. त्यातून पक्षाला बाहेर काढण्यासाठी येडियुरप्पा यांची मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आली. गुजरातमध्येही काहीशी अशीच परिस्थिती आहे. गुजरातमध्ये पुढील वर्षी निवडणुका होत आहेत. गुजरातमधील पटेल समाज भाजपवर नाराज आहे. त्यामुळे पटेल समाजाची नाराजी दूर करण्यासाठी भाजपने व्यूवहरचना आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रुपाणी यांचा राजीनामा घेण्यात आला असून त्यांच्या जागी पटेल समाजातून मुख्यमंत्री देण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. (why bjp change cm in his ruling states, read inside story)
VIDEO : 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 11 September 2021https://t.co/YOqfXp5vOt#SuperFastNews100 #SuperFast #FastNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 11, 2021
संबंधित बातम्या:
Gujarat CM Resigns: गुजरातच्या राजकारणात भूकंप; मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा
Vijay Rupani Resign : गुजरातचा पुढचा मुख्यमंत्री कोण? विजय रुपाणींच्या राजीनाम्याचं नेमकं कारण काय?
(why bjp change cm in his ruling states, read inside story)