आंबेडकरांचा द्वेष करणाऱ्यांना नरेंद्र मोदी फॉलो कसे करतात?; नितीन राऊत यांचा सवाल

| Updated on: Aug 15, 2021 | 9:04 PM

काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही सवाल केले आहेत. स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या नेत्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश करणाऱ्या पोस्टरला गितीका नावाच्या एका ट्रोलने आक्षेप घेतला आहे. (why does narendra modi follow to geethika: nitin raut)

आंबेडकरांचा द्वेष करणाऱ्यांना नरेंद्र मोदी फॉलो कसे करतात?; नितीन राऊत यांचा सवाल
nitin raut
Follow us on

मुंबई: काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही सवाल केले आहेत. स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या नेत्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश करणाऱ्या पोस्टरला गितीका नावाच्या एका ट्रोलने आक्षेप घेतला आहे. त्या गितीकाला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी का फॉलो करतात? हा देशाच्या राज्यघटनेला मानणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा हा अपमान आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे. तसेच बाबासाहेबांबद्दल अवमानकारक ट्विट करणारे ट्विटर अकांऊट तात्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. (why does narendra modi follow to geethika: nitin raut )

बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान काय? असा सवाल उपस्थित करणाऱ्या गितिकाच्या डोक्यात असा निर्बूध्द प्रश्न आला. ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षांचा इतिहास माहित नाही, ते सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करीत असतात, अशा शब्दांत राऊत यांनी संताप व्यक्त केला. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपने संविधान, भारताचा तिरंगा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नेहमीच विरोध आणि तिरस्कार केला आहे. या ताज्या ट्विटने पुन्हा एकदा मोदी,भाजप आणि संघ परिवाराचा खरा विद्वेषी चेहरा उघडकीस आणला आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.

हा पंतप्रधानांचा दुटप्पीपणा

दुर्दैव असे आहे की या भाडोत्री ट्रोल्सला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फॉलो करतात. एकीकडे निवडणुकीच्या पूर्वी दलितांचे पाय धुवायचे व दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अश्लाघ्य आरोप करणाऱ्या शिवराळ ट्रोल्सना फॉलो करायचे, हा दुटप्पीपणा देशाच्या पंतप्रधानांना शोभणारा नाही. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर विकृतपणे आनंद व्यक्त करणाऱ्या निखिल दधिच, आशिष मिश्रा यांनाही मोदी फॉलो करतात. यावरून भाजप, संघ परिवार आणि मोदी यांच्या मनात किती द्वेष, घृणा साचली आहे, हे दिसून येते, असं ते म्हणाले.

आंबेडकरी जनतेची माफी मागावी

डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल मोदींतर्फे व्यक्त करण्यात येणारा आदर हा केवळ दिखावा आहे. मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे आतून बाबासाहेबांचा आणि दलितांचा द्वेष करतात, हे यावरून आता सिद्ध झाले आहे, असंही त्यांनी सांगितलं. बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्यांनी आणि तिला छुपा पाठिंबा देणाऱ्यांनी तात्काळ देशाची आणि आंबेडकरी जनतेची माफी मागावी, अशी मागणी ही त्यांनी केली.

आता त्यांचे अकाऊंट सस्पेंड करा

दिल्लीत बलात्कार आणि नंतर हत्या करण्यात आलेल्या 9 वर्षीय दलित मुलीचे प्रकरण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लावून धरले. त्यामुळे त्यांचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करणाऱ्या टि्वटर इंडियाने आता राज्य घटनेच्या शिल्पकाराचा अपमान करणाऱ्या गितीका नावाच्या ट्रोल्सचे अकांऊट सस्पेंड करावे, अशी मागणीही त्यांनी केली. (why does narendra modi follow to geethika: nitin raut)

 

संबंधित बातम्या:

‘ताकद पहायची असेल तर उजनी धरण ओलांडून दाखवा’, माजी मंत्री तानाजी सावंतांचा दत्तात्रय भरणेंना सज्जड दम!

Independence Day Live Updates : कोरोनाचे नियम पाळा, लवकर कोरोनाला हद्दपार करु- उद्धव ठाकरे

Video: हेच ते वक्तव्य, ज्यावर दत्तात्रय भरणेंना दिलगिरी व्यक्त करावी लागली, नेमकं काय म्हणालेत ते बघा

(why does narendra modi follow to geethika: nitin raut)