केजरीवाल म्हणाले, नोटांवर गणपती आणि लक्ष्मीही हवेत; काँग्रेसचा बडा नेता म्हणाला, आंबेडकरांचा फोटो का नको?

| Updated on: Oct 26, 2022 | 1:27 PM

केजरीवाल यांच्या या मागणीवर भाजप नेते संबित पात्रा यांनी टीका केली आहे. अयोध्येत राम मंदिरात जाण्यास नकार देणारे हेच ते आम आदमी आहेत. परमेश्वर कोणतीच प्रार्थनेचा स्वीकार करत नाही.

केजरीवाल म्हणाले, नोटांवर गणपती आणि लक्ष्मीही हवेत; काँग्रेसचा बडा नेता म्हणाला, आंबेडकरांचा फोटो का नको?
काँग्रेसचा बडा नेता म्हणाला, आंबेडकरांचा फोटो का नको?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर: गुजरात विधानसभा निवडणुकीचे (gujarat assembly election) पडघम वाजताच सर्वच राजकीय पक्षांनी आपआपला डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. पंजाबमध्ये जे घडलं त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांचा पक्ष सज्ज झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता केजरीवाल हे गुजरातेत हिंदुत्वाचं कार्ड खेळण्याचं चिन्हं दिसत आहे. केजरीवाल यांनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचा फोटो असावा अशी मागणी केली आहे. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसच्या (congress) एका बड्या नेत्यानेही मोठी मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर गांधींजींबरोबर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो असावा अशी मागणी केली आहे. त्यावर काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नितीन राऊत यांनीही ट्विट करून आपली मागणी रेटली आहे. नोटांवर महात्मा गांधींबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो का नको? असा सवाल नितीन राऊत यांनी केला आहे.

केजरीवाल यांच्या मागणीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही प्रतिक्रिया व्यक्त करताना केजरीवाल यांची मागणी राजकीय असल्याचं म्हटलं आहे. देशातला रुपयाच संपत चालला आहे, रुपया जिवंत असेल तर तो प्रश्न आहे. आज रुपयांची होणारी घसरण थांबली पाहिजे. मतांच्या राजकारणासाठी हा धार्मिक वाद निर्माण केला जात आहे. केंद्र सरकार आणि केजरीवाल दोघे मिळून देशाला फसवत आहेत, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, केजरीवाल यांच्या या मागणीवर भाजप नेते संबित पात्रा यांनी टीका केली आहे. अयोध्येत राम मंदिरात जाण्यास नकार देणारे हेच ते आम आदमी आहेत. परमेश्वर कोणतीच प्रार्थनेचा स्वीकार करत नाही. काश्मीर पंडित खोटं बोलतात असंही त्यांनी म्हटलं होतं. आता तेच केजरीवाल नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचा फोटो असावा अशी मागणी करत आहेत. त्यांची ही मागणी राजकीय आहे, असं संबित पात्रा यांनी म्हटलं आहे.

चुकूनही दिवाळी साजरी केली तर तुरुंगात टाकू असा इशारा देणाऱ्या केजरीवाल यांना अचानक लक्ष्मी आणि गणपतीची आठवण का झाली? केजरीवाल कशा पद्धतीने यूटर्न घेत आहेत हे आपण सर्व पाहत आहोत, असंही ते म्हणाले.