Maharashtra Election 2024 : पिक्चर अभी बाकी है, EXIT Poll वर विश्वास ठेवण्यात पॉईंट नाही, कारण….

| Updated on: Nov 21, 2024 | 11:26 AM

Maharashtra Election 2024 : महाराष्ट्रात काल 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. मतदानानंतर लगेच एक्झिट पोल्सचे आकडे जाहीर झाले. काही एक्झिट पोल्सनुसार महायुती पुन्हा सत्तेवर येत आहे, तर काही एक्झिट पोल्सनुसार महाविकास आघाडी बाजी मारणार. या एक्झिट पोल्सनी लोकांना संभ्रमात टाकलय. महाराष्ट्रासंदर्भात या एक्झिट पोल्सवर विश्वास ठेवात येणार नाही, यामागे काही कारणं आहेत.

Maharashtra Election 2024 :  पिक्चर अभी बाकी है, EXIT Poll वर विश्वास ठेवण्यात पॉईंट नाही, कारण....
exit poll maharashtra
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

महाराष्ट्रात काल विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. मतदानाची वेळ संपल्यानंतर एग्झिट पोल्सचे आकडे जाहीर झाले. बहुतांश एग्झिट पोल्सनी महायुतीला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला आहे. काही एग्झिट पोल्सच्या दाव्यानुसार महाविकास आघाडी सुद्धा बाजी मारु शकते. एग्झिट पोल्सच्या आकड्यांवर नजर टाकली, तर यंदाची निवडणूक पूर्णपणे एकतर्फी होणार नाही. बहुतांश एग्झिट पोल्सचे आकडे पाहिल्यानंतर महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी अटी-तटीचा सामना होईल असं दिसतय. एग्झिट पोल्सचे आकडे योग्य ठरले, तर यंदा सत्ता स्थापनेत महाराष्ट्रात अपक्ष किंगमेकर ठरु शकतात. 23 तारखेला निकाल जाहीर झाल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. महाराष्ट्रात एकूण सात प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा मुख्य सामना आहे. मनसे स्वतंत्रपणे निवडणूक लढवतोय.

महाराष्ट्राच्या यंदाच्या निवडणुकीचा निकाल यासाठी सुद्धा खास आहे, कारण यावेळच्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 65.1 टक्के मतदान झालय. मागच्या 30 वर्षात सर्वाधिक मतदान महाराष्ट्रात झालाय. मुंबईबद्दल बोलायच झाल्यास 36 पैकी 34 सीट्सवर मतदानाची टक्केवारी वाढली आहे. मतदान संपल्यानंतर वेगवेगळ्या आघाड्या आपल्या विजयाचा दावा करत आहेत. लाडकी बहिण योजना गेमचेंजर ठरेल. निवडणुकीत याचा फायदा होईल असा महायुतीचा दावा आहे. पूर्ण बहुमताने पुन्हा सत्तेवर येणार असा महायुतीचा दावा आहे. लाडकी बहिण योजनेचे पैसे थेट महिलांच्या खात्यात जमा करण्याचा मोठा फायदा होईल याबद्दल महायुतीचे नेते आशावादी आहेत.

एक्झिट पोलवर विश्वास न ठेवण्याची दोन कारणं

एक्झिट पोलच्या आकड्यांवर सध्या तरी विश्वास ठेवण्यात पॉईंट नाहीय, कारण लोकसभा निवडणूक आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या वेळी हे आकडे चुकले होते. लोकसभेला बहुतांश एक्झिट पोल्सनी भाजपा स्वबळावर 272 चा आकडा ओलांडणार असं म्हटलेलं. पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही. भाजपाला 240 जागांवर समाधान मानाव लागलं. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्यावेळी सर्वच एग्झिट पोल्सनी भाजपाचा दारुण पराभव होईल असा अंदाज वर्तवलेला. कारण दहा वर्षापासून सत्तेत असल्यामुळे प्रस्थापित सरकार विरोधात लाट आहे, त्यात भाजपाचा पराभव होईल असा कयास होता. पण प्रत्यक्षात घडलं उलटं. भाजपाचा विजय झाला.

महाराष्ट्रासंदर्भात एक्झिट पोल्सच्या आकड्यांवर का विश्वास ठेवता येणार नाही?

महाराष्ट्रासंदर्भातही एक्झिट पोल्सच्या आकड्यांवर विश्वास ठेवण्यात पॉईंट नाहीय. कारण मतदान संपल्या, संपल्या एक्झिट पोल्सचे आकडे जाहीर झाले. पण शेवटच्या दोन-तीन तासात मतदानाचा जोर जास्त होता. शिवाय यंदा महाराष्ट्रात 30 वर्षातील सर्वात जास्त मतदान झालय. त्यामुळे एक्झिट पोल्सच्या आकड्यांवर कितपत विश्वास ठेवावा, हा प्रश्नच आहे.

महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढण्याची दोन कारणं

ज्यावेळी मतदान जास्त होतं, त्याचा अर्थ असा काढला जातो की, प्रस्थापित सरकार विरोधात एक लाट असते. पण सरकारने लाडकी बहिण सारख्या अन्य कल्याणकारी ज्या योजना आणल्या, त्यामुळे सुद्धा मतदानाची टक्केवारी वाढल्याची एक शक्यता नाकारता येत नाही.