“मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर झाल्याच अजूनपर्यंत मला माहित नाही. कोणाला मुख्यमंत्री करायचं? हा भाजपचा अंतर्गत विषय आहे. परंतु एकनाथ शिंदे महाराष्ट्र सोडून केंद्रात जाणार नाहीत हे निश्चित आहे. एकनाथ शिंदे यांनी कॉमन मॅन म्हणून जी प्रतिमा उंचावलेली आहे, त्याला सोडून ते दिल्लीच्या राजकारणात जाणार नाहीत. उपमुख्यमंत्री पदाबाबत ते आज संध्याकाळपर्यंत निर्णय घेतील असा अंदाज आहे” असं नवनिर्वाचित आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले.
बैठकीत गृह, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम या महत्त्वाच्या खात्याची शिवसेनेकडून मागणी करण्यात आलीय. त्यावर “बैठकीत काय झालय, यावर एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलेलं नाही. हे सर्व कथाकल्पित गोष्टी आहेत. शिवसेनेचा या राजकारणात वाटा मोठा आहे. म्हणून देताना त्यांना विचारपूर्वक खाती शिवसेनेला द्यावी लागतील” असं संजय शिरसाट म्हणाले.
गृहखात भाजप नाकारतय त्यावर शिवसेना प्रवक्ता म्हणाला….
गृहखात सोडण्यास भाजपने नकार दिलाय, त्यावर संजय शिरसाट म्हमाले की, “त्यांनी का नकार दिलाय, याची अजिबात कल्पना नाही. गृहखात महत्त्वाचं खातं आमच्याकडे असावं अशी मागणी केली, ते अत्यंत गरजेच आहे. कारण की ज्या दंगली झाल्या महाराष्ट्रात जाती-जातीमध्ये आंदोलनं झाली. ओबीसी-मराठा आंदोलनं झाली. ही आंदोलन हाताळण्यासाठी कसब पणाला लावाव लागेल. महाराष्ट्रात शांतता ठेवण्यासाठी ते आवश्यक आहे. गृहखात्याचा कारभार आम्ही चांगल्या प्रकारे करु. असा आम्हाला विश्वास आहे”
‘ती ग्रीप सोडणं योग्य होणार नाही’
एकनाथ शिंदे यांना राज्याच्या राजकारणात का रहायचय? त्यावर संजय शिरसाट म्हणाले की, “राज्याच्या राजकारणात त्यांना इंटरेस्ट आहे. उठावानंतर इतक्या जोमाने काम करणारा नेता दिल्लीच्या राजकारणात गेला, तर इथे लक्ष देता येणार नाही. लक्ष नसेल, तर ज्या अपेक्षा, इच्छा आहेत त्या पूर्ण होणार नाहीत. सर्वसामान्यांचा नेता, कॉमन मॅन म्हणून आता त्यांना ग्रिप मिळालीय. ती ग्रीप सोडणं योग्य होणार नाही असं मलाही वाटतं”
‘एकनाथ शिंदे फकीर टाईप माणूस’
राज्याच्या राजकारणात राहण्यासाठी दुसऱ्या क्रमांकाच पद स्वीकारण्याची मनाची तयारी आहे का? “नक्की सांगता येणार नाही. एकनाथ शिंदे फकीर टाईप माणूस आहे. ते काय घेतील? काय नाकारतील? कदाचित उपमुख्यमंत्री पद स्वीकारतील, कदाचित स्वीकारणारही नाहीत. पक्षाचे प्रमुख म्हणून राहतील. कोणताही निर्णय घेऊ शकतात. त्यांच्या निर्णयाचा कोणालाही अंदाज बांधता येणार नाही” असं संजय शिरसाट म्हणाले.