Video | येत्या विधानसभेत 100 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवणारच; जयंत पाटलांचा निर्धार

| Updated on: Feb 23, 2022 | 8:12 AM

विधानसभा निवडणुकीला (Assembly Election 2024) अद्याप दोन वर्ष बाकी आहेत. मात्र राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी निवडणुकीची (Election)  तयारी सुरू केली असल्याचे पहायला मिळत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत 100 पेक्षा अधिक जागा निवडूण आणू  असा निर्धार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला आहे.

Video | येत्या विधानसभेत 100 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवणारच; जयंत पाटलांचा निर्धार
जयंत पाटील यांचा भाजपला इशारा
Image Credit source: tv9
Follow us on

सोलापूर : विधानसभा निवडणुकीला (Assembly Election 2024) अद्याप दोन वर्ष बाकी आहेत. मात्र राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी निवडणुकीची (Election)  तयारी सुरू केली असल्याचे पहायला मिळत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत 100 पेक्षा अधिक जागा निवडूण आणू  असा निर्धार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला आहे. आम्ही गेल्या विधानसभेला काँग्रेससोबत आघाडी केली होती. तेव्हा आम्ही 114 जागा लढवल्या होत्या. यावेळी देखील आमचे पहिले प्राधान्य हे आघाडीलाच असणार आहे. आमच्या वाट्याला जेवढ्या जागा येतील तेवढ्या आम्ही निवडून आणू असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. आघाडीमध्ये आमच्या वाट्याला किती जागा येतील ते बघावे लागेल, मात्र जिथे आम्हाला संधी मिळेल तेथील प्रत्येक उमेदवार विजयी होईलच असा आमचा प्रयत्न असल्ययाचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

भाजपावर निशाणा

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी भाजपावर देखील निशाणा साधला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजकारणात खालच्या स्थरावर जाऊन आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. विशेष: यामध्ये भाजप आणि शिवसेना आघाडीवर आहेत. यावर जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया येत असते. भाजप ज्या भाषेत बोलत आहे किंवा त्यांना जी भाषा कळते त्यात उत्तर द्यावे लागेल. समोरच्याला समजेल अशा भाषेत उत्तर देण्याची काही लोकांची पद्धत असते. त्यामुळे याबाबत कोणाचेही समर्थन करता येणार नसल्याचे जयंत पाटलांनी म्हटले आहे.

मास्क घालणे ही प्रत्येकाची जबाबदारी

महाराष्ट्र कधी मास्कमुक्त होणार असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्र मास्कमुक्त व्हावा ही आमची देखील इच्छा आहे. लवकरच आपल्याला मास्क न घालता बाहेर फिरण्याची संधी मिळेल. मात्र अजूनही कोरोनाचे संकट कायम असल्याने प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखावी व मास्क न घालता घराबाहेर पडू नये. कोरोना नियमाचे काटेकोरपणे पालन करावे. तरच आपण महाराष्ट्राला मास्कमुक्त करू शकू.

संबंधित बातम्या

Video : सॉरी…सॉरी मामा तुमच्यागत माझं झालंय…पुन्हा फडणवीसांचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून कुणी केला?

Election Commission : निवडणूक आयोगाने निर्बंध केले शिथील; पूर्ण क्षमतेने रॅली, रोड शो घेण्यास मुभा

जळगावात भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत रक्षा खडसेंचं मोठं विधान, म्हणाल्या आगामी निवडणुकीत…