सिंधुदुर्ग : भाजपा नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार ( Mahavikas Aghadi government) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. जनता खडबडीत रस्त्यांवर, जनता खड्ड्यात तर राजाचे रस्ते गुळगुळीत असा टोला त्यांनी लगावला आहे. ते सिंधुदुर्गमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. आमच्या राज्याला मुख्यमंत्रीच राहिला नसल्याची टीकाही राणे यांनी यावेळी केली.
पुढे बोलताना राणे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळात जनतेचे हाल सुरू आहेत. रस्त्यांची चाळणी झाली आहे. जागोजागी खड्ड्ये पडले आहेत. सामान्य जनता रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमधून मार्ग काढते, तर दुसरीकडे मात्र राजाचे रस्ते हे गुळगुळीत आहेत. आम्ही जेव्हा रस्त्यांच्या विकासासाठी पैसे मागतो, तेव्हा निधी शिल्लक नसल्याचे आम्हाला सांगितले जाते. मात्र दुसरीकडे विधानसभा मार्गावरील रस्ते गुळगुळीत बनवले जातात, हे राज्याचे दुर्दैव आहे. राज्यातील सर्व सुविधा एकाच कुटुंबासाठी का? असा सवाल उपस्थित करत नितेश यांनी ठाकरे कुटुंबावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
दरम्यान आपल्या राज्याला मुख्यमंत्रीच राहिलेला नाही. राज्याचे अधिवेशन सुरू आहे, मात्र मुख्यमंत्री कुठेही दिसत नाहीत. त्यामुळे राज्य नेमके कोण चालवतो असा प्रश्न पडतो. राज्याचा चार्ज सध्या कोणाकडे दिला आहे, याचीही काही माहिती नाही. रश्मी ठाकरे या मुख्यमंत्री होणार आहे, अशी चर्चा आहे, निदान ते तरी जाहीर करा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा त्यांच्या पक्षातील एकाही नेत्यावर सध्या भरोसा राहिलेला नाही. मुख्यमंत्री अधिवेशनात कुठे दिसत नाहीत. मग अशा अवस्थेमध्ये जनतेला न्याय कसा मिळणार? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
आणि भास्कर जाधवांनी स्वत:चा शब्द मागे घेतला, अंगविक्षेपही मागे घेतला, सभागृहात नेमकं काय घडलं?
VIDEO | भाजप आमदार मोनिका राजळेंचे चौकार-षटकार, कॉलेज टीमची कॅप्टन 28 वर्षांनंतर पुन्हा मैदानात