Ram Mandir | देशात एकाबाजूला राम मंदिर उद्घाटनाची जय्यत तयारी सुरु आहे. 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची सगळ्यांनाच उत्सुक्ता आहे. प्रत्येक राम भक्ताला अयोध्येतील या सोहळ्यात सहभागी होण्याची इच्छा आहे. पण ते शक्य नाहीय. त्यामुळे स्थानिक पातळीवर या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. एकाबाजूला उद्घाटनाची तयारी सुरु आहे. त्याचवेळी दुसऱ्याबाजूला या मुद्यावरुन राजकारणही सुरु झाल आहे. काही राजकीय पक्ष या दिवशी अयोध्येला जाणार नाहीयत. त्यांनी हा भाजपा, RSS चा कार्यक्रम असल्याच म्हटलं आहे. त्याऐवजी विरोधी पक्षाचे नेते दुसऱ्या मंदिरात पूजा अर्चा करणार आहेत. केंद्र आणि विविध राज्य सरकारांनी या दिवशी सुट्टीची घोषणा केली आहे. त्यावरही काही राजकीय नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलय.
आता तामिळनाडू सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टालिन यांनी या मुद्यावर वक्तव्य केलं आहे. त्यांनी अयोध्या राम मंदिर मुद्यावर डीएमकेची भूमिका स्पष्ट केली. “द्रमुक धर्माच्या विरोधात नाहीय. आम्ही कुठल्याही मंदिर निर्माणाच्या विरोधात नाहीय” असं उदयनिधी स्टालिन यांनी म्हटलं आहे. डीएमकेला नास्तिक सिद्धांत असलेला पक्ष मानला जातो.
धर्म आणि राजकारणाबद्दल काय म्हटलं?
“धर्म आणि राजकारणाला एकत्र करु नका, असं आमच्या नेत्याने सांगितलं होतं. आम्ही कुठल्याही मंदिर निर्माणाच्या विरोधात नाहीय. पण ज्या ठिकाणी मशीद पाडण्यात आली, त्या ठिकाणी मंदिर निर्माणाच आम्ही समर्थन करत नाही” असं उदयनिधी स्टालिन म्हणाले. तामिळनाडूच्या राजकारणातील प्रमुख विरोधी पक्ष अण्णाद्रमुकवर त्यांनी टीका केली. राम जन्मभूमी मंदिर आंदोलनाच्यावेळी अण्णाद्रमुकने अयोध्येत कारसेवक पाठवले होते, असं उदयनिधी स्टालिन म्हणाले.
गर्भगृहात रामललाची मुर्ती स्थापित
अयोध्या राम मंदिराच्या गर्भगृहात रामललाची मुर्ती स्थापित करण्यात आली आहे. पाच वर्षीय रामाची 51 इंच ऊंचीची काळ्या दगडाची मुर्ती चार तासाच अनुष्ठान आणि मंत्रोच्चारानंतर स्थापित करण्यात आली. 22 जानेवारीला होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याआधी सतत अनुष्ठान आयोजित करण्यात येत आहेत.