मुंबई : 22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान जन्माला आलेले व्यक्ती धनु राशीच्या असतात. या राशीच्या लोकांना अधिकाअधिक प्रवास करायला आवडतो. या राशींच्या लोकांना बौद्धिक आणि अध्यात्मिक गोष्टींची आवड असते. या राशींचे लोक नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी तयार असतात. नवीन लोकांना भेटणे आणि नवीन संस्कृती शोधणून ती समजून घेणे यासारख्या गोष्टी करण्यामध्ये धनू राशीच्या व्यक्तींना रस असतो.
धनु राशींच्या व्यक्तीची वैशिष्ट्ये
धनु राशीचे लोक स्वभावाने सरळ मानले जातात. कोणताही गोष्ट मनात न ठेवता ते समोरच्या व्यक्तीला ती गोष्ट बोलून दाखवतात. या राशीचे लोक अत्यंत थेट आणि प्रामाणिक असतात. त्याला विनोदाची चांगली जाण असते . त्याच्या याच गुणामुळे ते कोणालाही हसवू शकतात. त्यांच्याकडे कोणीही सहज आकर्षित होते. त्यांना सर्व काही माहित नसले तरी त्यांना सर्व माहित असल्याचा आव ते आणतात. यामुळे, ते सहसा उद्धट किंवा गर्विष्ठ म्हणून समोर येतात. दररोज एकच गोष्ट करण्याची कल्पना त्याला आवडत नाही. त्यांना नवीन लोकांना भेटायला आवडते आणि ते स्वभावाने बहिर्मुख असतात.
उपजीविका
त्यांना त्यांचे कामाचे ठिकाण आणि वातावरण निवडण्याचे स्वातंत्र्य हवे असते आणि जेव्हा ते कंटाळतात तेव्हा ते बदलतात. त्यांना कामामध्ये मोकळेपणा आवडतो धनु राशीसाठी योग्य असलेल्या काही करिअरमध्ये अभिनेते, डिझाइनर, लेखक आणि मॉडेल यांचा समावेश होतो. हे क्षेत्र त्यांना त्यांच्या स्वतःच्या जीवनाला एक वेगळीच दिक्षा देवून जातात.
प्रेम
धनु राशीचे लोक कोणतेही नातेसंबंधात काहीतरी नवीन आणतील आणि त्यांच्यासोबत राहण्यासाठी एक रोमांचक अनुभव असू शकतो. पण त्यांच्य सोबत राहणं याचा एक त्रास आहे तो म्हणजे या राशीचे लोक प्रत्याक गोष्ट गंभीरतेने पाहात असतात.
सुसंगतता
धनु राशीचे लोक मेष, सिंह, मिथुन आणि कुंभ राशीच्या लोकांशी सुसंगत असतात. धनु सत्य शोधणारे असल्याने आणि नेहमी नवीन साहसाच्या शोधात असतात, या 4 राशी त्यांच्यासाठी सर्वोत्तम साथीदार बनतात. धनु राशीच्या लोकांप्रमाणे, सिंह राशीला देखील जीवनाची लालसा असते आणि ते नवीन साहस किंवा प्रवास करण्यास कधीही मागे हटत नाहीत.कुंभ राशीचे व्यक्तिमत्व धनु राशीसारखे असते. तो बहिर्मुखी, अपारंपरिक आणि अतिशय सरळ आहे. अशा प्रकारे, ते धनु राशीशी एक उत्तम जोडी बनवतात.
(टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.)
कोणतीच कामं वेळेत होत नाहीत? शनिवारी 5 कामे करुन बघा चुटकीसरशी होतील सर्व कामं