डॉ. अजय भाम्बी –
मुंबई : बुधवार 3 नोव्हेंबर 2021 (Aquarius/Pisces Rashifal). बुधवारचा दिवस हा श्री गणेशाला समर्पित असतो. बुधवारी विघ्नहर्त्याची पूजा केल्याने ते प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि आपली सर्व विघ्न दूर करतात. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. कुंभ आणि मीन राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या बुधवारचं संपूर्ण राशीभविष्य –
घरातील वरिष्ठांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाने विशेष निर्णय घेऊ शकाल. एखाद्या गरजू मित्राला मदत केल्याने मन प्रसन्न राहील. तुमच्या तत्त्वांशी कोणतीही तडजोड न केल्याने तुम्ही खंबीर राहाल.
नातेवाईकांशी कोणत्याही विषयावर वाद होऊ शकतात. मात्र, यावेळी तुम्हाला संयम ठेवावा लागेल. विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासातून हटवून निरुपयोगी कामे करण्यात लागत आहे. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करणे कठीण होईल. कायदेशीर कामात अडकू नका.
यंत्रसामग्री आणि तेलाशी संबंधित व्यवसाय मोठ्या प्रमाणात नफा मिळवण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे तुमच्या कामावर पूर्ण लक्ष ठेवा. परंतु, प्रत्येक कामात कागदी व्यवहार पारदर्शक असणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची चौकशी बसू शकते.
लव्ह फोकस – जास्त व्यस्ततेमुळे तुम्ही कुटुंबाकडे लक्ष देऊ शकणार नाही. पण जोडीदाराच्या सहकार्याने कौटुंबिक वातावरण योग्य राहील.
खबरदारी – खोकला, सर्दी यांसारख्या घशाच्या समस्या राहू शकतात. अजिबात बेफिकीर राहू नका.
लकी रंग – गुलाबी
लकी अक्षर – पी
फ्रेंडली नंबर – 6
योजनाबद्ध पद्धतीने कामे पार पाडा. पण, समंजसपणाने आणि बुद्धिमत्तेने कार्य सुरळीतपणे पूर्ण करु शकाल. घरात मित्र किंवा पाहुणे येतील आणि सर्व सदस्य परस्पर संवादाचा आनंद घेतील.
तुमचा स्वभाव साधा आणि संतुलित ठेवा. राग आणि आवेगामुळे तुम्ही काही चुकीचे निर्णय घेऊ शकता. विद्यार्थ्यांनी अभ्यासात कोणत्याही प्रकारची तडजोड करु नये. अन्यथा परिणाम वाईट होऊ शकतो.
केटरिंगशी संबंधित व्यवसाय हळूहळू स्थिरावत आहेत. यावेळी अशा व्यवसायात मोठ्या नफ्याची अपेक्षा आहे. पण, तरीही आपल्या कामाचा दर्जा सुधारण्याची गरज आहे. नोकरीत कामाचा ताण अधिक राहील, तसेच ओव्हरटाईमही करावा लागू शकतो.
लव्ह फोकस – पती-पत्नीमधील संबंध चांगले राहतील. प्रेमसंबंधांमध्येही तीव्रता राहील.
खबरदारी – चुकीच्या आहारामुळे गॅस आणि पोट खराब होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. शक्य तितक्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करा.
लकी रंग – लाल
लकी अक्षर – बी
फ्रेंडली नंबर – 9
Weekly Horoscope 31 October– 06 November, 2021 | कसा असेल येणारा आठवडा, जाणून घ्या 31 ऑक्टोबर ते 06 नोव्हेंबर पर्यंतचं संपूर्ण राशीभविष्यhttps://t.co/1v1E8UZlF6#Astrology| #rashi | #Rashibhavishyarashifal | #WeeklyHoroscope
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 31, 2021
Aquarius/Pisces Daily Horoscope Of 3 November 2021 Kumbha And Meen Rashifal Today
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Zodiac Signs | या 5 राशीच्या व्यक्ती भावनिकरित्या असतात सर्वात मजबूत, जाणून घ्या तुमच्या राशीबाबात
Zodiac Signs | या दोन राशींचा विवाह म्हणजे रोज घरात वादाला आमंत्रण, शुभमंगल करताना व्हा सावधान