Shani : न्यायदेवता शनिची वक्री चाल देणार साथ, या राशींना मिळणार धन योगाचा लाभ

| Updated on: Apr 25, 2023 | 3:31 PM

Shani Vakri 2023 : शनिदेव स्वत:च्या कुंभ राशीत विराजमान असून वक्री अवस्थेत जाणार आहे. त्यामुळे काही राशींना अडचणीचा सामना, तर काही राशींना जबरदस्त लाभ होणार आहे.

Shani : न्यायदेवता शनिची वक्री चाल देणार साथ, या राशींना मिळणार धन योगाचा लाभ
Shani : शनिदेव कुंभ राशीत होणार वक्री, या राशींना मिळणार या स्थितीचा लाभ
Follow us on

मुंबई : ज्योतिषशास्त्रात सर्वाधिक लक्ष हे शनिदेवांच्या स्थिती आणि स्थानावर असतं. कारण शनिदेव एकदा का राशीला आले की, जातकाची काय अवस्था होते सांगायला नको. सध्या शनिदेव स्वरास असलेल्या कुंभ राशीत विराजमान आहेत. 17 जून 2023 पासून वक्री स्थितीत जाणार आहे. 17 रोजी रात्री 10 वाजून 48 मिनिटांनी कुंभ राशीत वक्री अवस्थेत जाईल. या स्थितीत शनिदेव 4 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 8 वाजून 26 मिनिटांपर्यंत असतील. त्यानंतर मार्गस्थ होतील. शनिच्या या स्थितीचा काही राशींना फायदा तर काही राशीना त्रास होणार आहे.

शनिदेवांच्या कुंभ राशीतील गोचरामुळे मकर राशीला साडेसातीचा शेवटचा टप्पा, कुंभ राशीला मधला टप्पा आणि मीन राशीला पहिला टप्पा सुरु आहे. तर कर्क आणि वृश्चिक राशीला अडीचकी सुरु आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशीला लाभ आणि कोणत्या राशीला तोटा होईल ते..

या राशीच्या लोकांना होणार फायदा

सिंह : या राशीच्या सप्तम स्थानात शनिदेव वक्री होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात जबरदस्त फायदा होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्णत्वास येणार आहेत. व्यवसायात अचानक लाभ दिसून येईल. सप्तम स्थानावरून जोडीदाराचा स्वभाव कळून येतो. जोडीदाराची तुम्हाला चांगली साथ मिळेल.कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतित कराल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.

धनु : या राशीच्या तिसऱ्या स्थानात शनिदेव वक्री होणार आहेत. या राशीच्या जातकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी चांगला मोबदला मिळेल. तसेच पदोन्नती आणि पगारवाढ होऊ शकते. कौटुंबिक वातातवरण चांगलं राहील. भावडांची चांगली साथ मिळेल. लांबच्या प्रवासाला जाण्याचा योग जुळून येईल. आरोग्य विषयक तक्रारीही निवळताना या काळात दिसतील.

मकर : या राशीची शनि साडेसातीच्या शेवटचा टप्पा सुरु आहे. तसेच शनिदेव दुसऱ्या स्थानात आहे. या स्थानाला धनस्थान म्हंटलं जातं. त्यामुळे या काळात आर्थिक स्थिती चांगली राहील. जमिनीविषयक व्यवहार या काळात पूर्ण होतील. वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होईल. गेल्या काही दिवसांपासून असलेली अडचण दूर होईल. पण या काळात वाणीवर नियंत्रण ठेवा.

मीन : या राशीला शनि साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. तसेच व्यय म्हणजेच द्वादश स्थानात शनिदेव आहेत. त्यामुळे या राशीच्या जातकांना विदेशी फिरण्याचा योग जुळून येईल. व्यवसायात प्रगती दिसून येईल. आर्थिक स्थिती चढ उतार दिसून येईल. पण आर्थिक अडचणीमुळे काम अडकणार नाहीत. व्यय स्थान असल्याने पैसा पाण्यासारखा खर्च होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)