Astrology : मार्च महिन्यात या राशीच्या लोकांवर राहाणार शनीदेवाची कृपा

| Updated on: Feb 18, 2023 | 5:56 PM

शनिदेव सध्या कुंभ राशीत अस्त झाला असून मार्चच्या सुरुवातीला त्याचा उदय होणार आहे. अशाच काही राशींना शनीच्या उदयावर विशेष लाभ मिळण्याचे संकेत आहेत.

Astrology : मार्च महिन्यात या राशीच्या लोकांवर राहाणार शनीदेवाची कृपा
शनिदेव
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : ज्योतिषशास्त्रामध्ये शनिदेवाची (Shanidev) खूप महत्वाची भूमिका आहे. जेव्हा शनि राशी बदलतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींवर पडतो. ज्योतिषशास्त्रात शनि हा न्याय आणि कर्म देणारा मानला जातो. ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शनिदेव शुभ स्थानावर असतो त्यांना चांगले फळ मिळते, तर कुंडलीमध्ये शनिदेव अशुभ असल्यास त्या व्यक्तीला अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. शनिदेव सध्या कुंभ राशीत अस्त झाला असून मार्चच्या सुरुवातीला त्याचा उदय होणार आहे. अशाच काही राशींना शनीच्या उदयावर विशेष लाभ मिळण्याचे संकेत आहेत. सर्व ग्रहांमध्ये शनिदेव हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो, ज्यामुळे त्याचे शुभ-अशुभ प्रभाव दीर्घकाळ राहतात. शनिदेव कुंभ आणि मकर राशीचा स्वामी आहे आणि जेव्हा तो तूळ राशीत असतो तेव्हा तो उत्तम परिणाम देतो, तर मेष राशीमध्ये दुर्बल असतो.

30 जानेवारी 2023 पासून शनिदेव कुंभ राशीत अस्त झाला असून आता 6 मार्च 2023 रोजी रात्री 11.36 वाजता कुंभ राशीत उगवेल. शनीच्या उदयामुळे काही लोकांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणकोणत्या राशी आहेत ज्यांना शनीच्या उदयामुळे जास्तीत जास्त फायदा होईल.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीचा उदय वरदानापेक्षा कमी नसेल. या राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ असेल. जास्तीत जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला नफा आणि योजनांमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे लवकरात लवकर पूर्ण होतील, त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत जोरदार वाढ होईल. तुम्हाला एकाच वेळी अनेक संधी मिळतील. समाजात मान-सन्मान मिळेल.

हे सुद्धा वाचा

सिंह

कुंभ राशीत शनीचा उदय सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ काळ आहे. सूर्य सिंह राशीचा अधिपती ग्रह आहे, अशा स्थितीत शनीचा उदय तुम्हाला मोठा लाभ देईल. नवीन संधी मिळाल्याने सुख-समृद्धीचा मार्ग खुला होईल. गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही जे काही नियोजन करत आहात ते तुम्ही आता साध्य करू शकाल. कौटुंबिक संबंध वाढतील. मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल.

कुंभ

शनी हा कुंभ राशीचा स्वामी मानला जातो आणि तो या राशीत स्थिरावला होता आणि या राशीत पुन्हा उदयास येणार आहे. अशा स्थितीत सर्व 12 राशींपैकी कोणत्याही एका राशीला जास्तीत जास्त लाभ मिळत असेल तर ती कुंभ राशी असेल. या राशीच्या लोकांसाठी मार्च महिना अनेक संधी घेऊन येईल. नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध होतील. या महिन्यात तुम्हाला अचानक पैसे मिळण्याच्या चांगल्या संधी मिळतील. तुमचे बिघडलेले किंवा थांबलेले काम लवकरच पूर्ण होईल.

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी शनीचा उदय लाभदायक ठरेल. ज्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून कोणत्या ना कोणत्या समस्येचा सामना करावा लागत होता त्यांच्यासाठी मार्च महिना खूप चांगले दिवस घेऊन येईल. सुख-समृद्धी आणि ऐशोआरामात वाढ होईल. धार्मिक आणि शुभ कार्यक्रमात तुमचा सहभाग तुम्हाला शांततेचा अनुभव देईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)